नवी दिल्ली : तीन दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारी राजधानी दिल्लीत सोने २८५ रुपयांनी घसरून ३0,६५0 रुपये तोळा झाले. चांदीही ४00 रुपयांनी घसरून ४६,५00 रुपये किलो झाली. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २८५ रुपयांनी घसरून अनुक्रमे ३0,६५0 रुपये आणि ३0,५00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला.
तत्पूर्वी, गेल्या तीन दिवसांत सोने २३५ रुपयांनी वाढले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मात्र १00 रुपयांनी घसरून २३,४00 रुपये झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्या-चांदीच्या भावात घसरण
तीन दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारी राजधानी दिल्लीत सोने २८५ रुपयांनी घसरून ३0,६५0 रुपये तोळा झाले. चांदीही ४00 रुपयांनी घसरून ४६,५00 रुपये किलो झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2016 02:55 AM2016-07-15T02:55:04+5:302016-07-15T02:55:04+5:30