नवी दिल्ली - काही दिवस भाव वाढ झाल्यानंतर आता सोन्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सराफा बाजारात सलग चौथ्या दिवशी सोन्याचे भाव घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया मजबूत झाल्याने सराफा बाजारामध्ये प्रति दहा ग्रॅमसाठी सोन्याची किंमत ४४० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोन्याच्या तुलनेत चांदी अधिक स्वस्त झाली असून, आज चांदीचा प्रतिकिलो दर ६३ हजार ६२८ रुपयांवर आला आहे. (Gold and silver prices fell again today, falling sharply in four days)
सराफा बाजारामध्ये सोन्याचे आजचे दर ४७ हजार ४४५ रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा होता. मंगळवारी सराफा बाजारामध्ये जून वायदा असलेल्या सोन्याच्या दरात ०.०४ टक्क्यांनी घट झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केल्यास हाजिर सोन्याचा दर ०.१ टक्क्यांनी घसरून १ हजार ७७७.९३ डॉलर प्रति औंस एवढा झाला आहे.
सोन्याच्या तुलनेत चांदीची किंमत सुद्धा घसरली असून, औद्योगिक मागणी घटल्याने एक किलोग्रॅम चांदीचा दर ६९ हजार ३२९ रुपयांवरून घसरून ६८ हजार ६२३ रुपये एवढा झाला आहे.
गुडरिटर्न्स संकेतस्थळानुसार २२ कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. दिल्लीमध्ये ४६ हजार २४० रुपये प्रति १० ग्रॅमचेन्नईमध्ये ४४ हजार ६९० कुपये प्रति दहा ग्रॅम कोलकात्यामध्ये ४७ हजार ४३० रुपये प्रति १० ग्रॅम