Join us

सोन्या-चांदीच्या भावात वाढ

By admin | Published: September 20, 2016 5:44 AM

दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोने ११0 रुपयांनी वाढून ३१,१५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.

नवी दिल्ली : दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोने ११0 रुपयांनी वाढून ३१,१५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीही ५२५ रुपयांनी वाढून ४५,५00 रुपये किलो झाली. सिंगापूर य्बाजारात सोने १,३१५.३0 डॉलर प्रति औंस झाले. चांदी २.१ टक्क्यांनी वाढून १९.१७ डॉलर प्रति औंस झाली. चांदीच्या भावात ६ सप्टेंबरनंतरची ही सर्वोच्च तेजी ठरली. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव ११0 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३१,१५0 रुपये आणि ३१,00 रुपये प्रति तोळा झाला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मात्र २४,४00 रुपये, असा स्थिर राहिला. दिल्लीच्या बाजारात तयार चांदी ५२५ रुपयांनी वाढून ४५,५00 रुपये किलो झाली. तयार चांदी ५६0 रुपयांनी वाढून ४५,८३0 रुपये किलो झाली. चांदीच्या शिक्क्यांचा भाव मात्र खरेदीसाठी ७५ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७६ हजार रुपये प्रति शेकडा असा स्थिर राहिला.