नवी दिल्ली : सहा आठवड्यांच्या नीचांकावर गेलेले सोने गुरुवारी २५ रुपयांनी वाढून २९,२२५ रुपये तोळा झाले. चांदीही १५0 रुपयांनी वाढून ३९,६00 रुपये किलो झाली. जागतिक बाजारातील तेजी आणि दागिने निर्मात्यांनी वाढविलेली खरेदी यामुळे सोने तेजाळले, तर चांदीला औद्योगिक क्षेत्र तसेच शिक्के निर्मात्यांनी वाढविलेल्या खरेदीचा लाभ मिळाला. सिंगापूर येथील बाजारात सोने 0.८ टक्क्याने वाढून १,२३४.३६ डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २५ रुपयांनी वाढून अनुक्रमे २९,२२५ रुपये आणि २९,0७५ रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. त्याआधी दोन सत्रांत सोने ४५0 रुपयांनी उतरले होते. सोन्याच्या आठ ग्रॅमच्या गिन्नीचा भाव २३ हजार रुपये असा कायम राहिला.
सोन्या-चांदीच्या भावात वाढ
By admin | Published: May 27, 2016 2:02 AM