Join us

सोन्या-चांदीच्या भावात वाढ

By admin | Published: July 16, 2016 2:58 AM

सोन्याचा भाव १५0 रुपयांनी वाढून ३0,८00 रुपये तोळा झाला आहे. चांदीही २00 रुपयांनी वाढून ४६,७00 रुपये किलो झाली आहे.

नवी दिल्ली : सोन्याचा भाव १५0 रुपयांनी वाढून ३0,८00 रुपये तोळा झाला आहे. चांदीही २00 रुपयांनी वाढून ४६,७00 रुपये किलो झाली आहे. ज्वेलरांनी केलेली जोरदार खरेदी तसेच स्पॉट मार्केटमधील चांगली उलाढाल याचा लाभ मौल्यवान धातूंना मिळाला. जागतिक बाजारात मात्र सोन्याचा भाव घसरला. सिंगापूर येथील बाजारात सोने 0.६ टक्क्याने घसरून १,३२६.९६ डॉलर प्रति औंस झाले.राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १५0 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३0,८00 रुपये आणि ३0,६५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.