Lokmat Money > बिझनेस न्यूज > सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचांदीची दरवाढ; पाहा काय आहेत नवे दर

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचांदीची दरवाढ; पाहा काय आहेत नवे दर

डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या झालेल्या घसरणीमुळे ही दरवाढ झाल्याचं एचडीएफसी सिक्युरिटीजनं सांगितलं.

By जयदीप दाभोळकर | Published: January 5, 2021 06:50 PM2021-01-05T18:50:42+5:302021-01-05T18:53:06+5:30

डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या झालेल्या घसरणीमुळे ही दरवाढ झाल्याचं एचडीएफसी सिक्युरिटीजनं सांगितलं.

Gold and silver prices rise for second day in a row See what the new rates are | सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचांदीची दरवाढ; पाहा काय आहेत नवे दर

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचांदीची दरवाढ; पाहा काय आहेत नवे दर

Highlightsडॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरणसोन्याच्या दरात ३३५ रूपयांची वाढ

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सोन्याच्या वाढलेल्या मागणीमुळे मंगळवारी सोन्याचे दरात वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजनं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दिल्लीत सोन्याच्या दरात ३३५ रूपयांची वाढ झाली. यानंतर वाढीनंतर दिल्लीतील सोन्याचे दर ५० हजार ९६९ रूपये प्रति १० ग्रामवर पोहोचले. डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या झालेल्या घसरणीमुळे ही दरवाढ झाल्याचं एचडीएफसी सिक्युरिटीजनं सांगितलं. गेल्या सत्रात बाजार बंद होताना सोन्याचा दर ५० हजार ६३४ रूपये होता. 

सर्राफा बाजारात मंगळवारी सोन्यासह चांदीचीही दरवाढ दिसून आली. चांदीच्या दरात ३८२ रूपयांची वाढ झाली. या वाढीनंतर चांदीचा दर ६९ हजार ६९३ रूपये प्रति किलो इतका झाला. यापूर्वीच्या सत्रात बाजार बंद होताना चांदीचा दर ६९ हजार ३११ रूपये इतका होता. जागतिक स्तरावरही मंगळवारी सोन्याचांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. ब्लूमबर्गनं दिलेल्या माहितीनुसार कॉमेक्सवर सोन्याच्या दरात ६.२० डॉलर्सची वाढ होऊन तो १ हजार ९५२.८० डॉलर्स प्रति औंसवर पोहोचला. 

"सोन्याच्या दरात सलग चार महिने घसरण दिसून आली होती. परंतु आता ती वेळ गेली. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. २०२१ मध्ये सोन्याचे दर २,१५० ते २,२०० डॉलर्स आणि चांदीचे दर ३५ ते ४० डॉलर्सपर्यंत जाऊ शकतात," अशी माहिती ट्रेडबुल सिक्युरिटीचे सीनिअर टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट भाविक पटेल यांनी दिली.

"२०२१ मध्ये सोन्यावर गुंतवणूकदारांचं लक्ष असेल. जगभरातील प्रमुख बँकांनी व्याजदर कमी ठेवणं आणि लिक्विडीटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २०२१ मध्ये सोन्याच्या किंमतीवर लसीची क्षमता, विकसनशील देशांमधील लसीकरणाची प्रक्रिया, कमी व्याजदर व्यवस्था आणि लिक्विडिटीच्या बाबात जागतिक बँकेचा दृष्टीकोन अशा बाबींचा प्रभाव पडू शकतो," अशी माहिती मिल्कवूड केन इंटरनॅशनलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निश भट्ट यांनी दिली. 

काय आहेत २४ कॅरेट सोन्याचे दर?

मुंबई - ५३ हजार ३९० 
दिल्ली - ५३ हजार ३१५
कोलकाता - ५३ हजार  
हैदराबाद - ५३ हजार १६०
बंगळुरू - ५३ हजार १६०
 

Web Title: Gold and silver prices rise for second day in a row See what the new rates are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.