नवी दिल्ली : सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर शुक्रवारी सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली. सोने २५0 रुपयांनी घसरून २६,६५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीही २५0 रुपयांनी घसरून ३४,४00 रुपये किलो झाली.
जागतिक बाजारातील नरमाईबरोबरच स्थानिक बाजारात घटलेल्या मागणीचा परिणामही मौल्यवान धातूंवर झाला. ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांनी आपल्या मागणीत मोठी कपात केल्याचा फटका बाजाराला बसला.
सिंगापूर येथील बाजारात सोन्याचा भाव 0.३ टक्क्यांनी घसरून १,0९८.१२ डॉलर प्रति औंस झाला. रुपयात झालेली सुधारणाही बाजाराला बळ देऊन गेली. चांदीचा भावही सोन्याच्याच मार्गाने गेला. तयार चांदीचा भाव २५0 रुपयांनी घसरून ३४,४00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव २८५ रुपयांनी घसरून ३४,३५५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजार रुपयांनी घसरून खरेदीसाठी ४९ हजार रुपये आणि विक्रीसाठी ५0 हजार रुपये प्रतिशेकडा झाला.
सोन्या-चांदीचा भाव घसरला
सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर शुक्रवारी सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली. सोने २५0 रुपयांनी घसरून २६,६५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले
By admin | Published: January 23, 2016 03:45 AM2016-01-23T03:45:03+5:302016-01-23T03:45:03+5:30