Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्या-चांदीच्या भावात तेजी

सोन्या-चांदीच्या भावात तेजी

खरेदीत वाढ झाल्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागताना सोन्या-चांदीच्या भावात सोमवारी वाढ झाली.

By admin | Published: January 26, 2016 02:32 AM2016-01-26T02:32:59+5:302016-01-26T02:32:59+5:30

खरेदीत वाढ झाल्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागताना सोन्या-चांदीच्या भावात सोमवारी वाढ झाली.

Gold and silver prices steady on the bullion market | सोन्या-चांदीच्या भावात तेजी

सोन्या-चांदीच्या भावात तेजी

नवी दिल्ली : खरेदीत वाढ झाल्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागताना सोन्या-चांदीच्या भावात सोमवारी वाढ झाली. सोने १0 रुपयांनी वाढून २६,७५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदी १९0 रुपयांनी वाढून ३४,५00 रुपये किलो झाली.
जागतिक पातळीवर भाववाढ झाल्याचा फायदा देशांतर्गत बाजाराला झाला. दुसरीकडे ज्वेलरांनीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली. लग्नसराईसाठी बाजारात खरेदी वाढत आहे, असे बाजारातील जाणकारांनी सांगितले. आशियाई बाजारांतही तेजीचा कल पाहायला मिळाला.
सिंगापूर येथील बाजारात सोने 0.३ टक्क्यांनी वाढून १,१0१.0४ डॉलर प्रति औंस झाले. चांदीचा भाव 0.५ टक्क्यांनी वाढून १४.0९ डॉलर प्रति औंस झाला.
राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव १४0 रुपयांनी वाढून अनुक्रमे २६,७५0 रुपये आणि २६,६00 रुपये तोळा झाला. गेल्या दोन दिवसांत सोने २९0 रुपयांनी घसरले होते. सोन्याच्या ८ ग्रॅम गिन्नीचा भाव २२,४00 रुपये असा आदल्या सत्राच्या पातळीवर कायम राहिला.
(वृत्तसंस्था)

Web Title: Gold and silver prices steady on the bullion market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.