Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold and Silver Rate: सोनं चमकलं, चांदीचा भावही वधारला; जाणून घ्या आजचा दर

Gold and Silver Rate: सोनं चमकलं, चांदीचा भावही वधारला; जाणून घ्या आजचा दर

चांदीचा भावही 0.46 टक्क्यांच्या वाढीसह 64,529 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 10:36 AM2022-02-15T10:36:15+5:302022-02-15T10:37:12+5:30

चांदीचा भावही 0.46 टक्क्यांच्या वाढीसह 64,529 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहचला आहे.

Gold and Silver Rate: Gold has risen by Rs 2,200 in the last seven days, find out today's price | Gold and Silver Rate: सोनं चमकलं, चांदीचा भावही वधारला; जाणून घ्या आजचा दर

Gold and Silver Rate: सोनं चमकलं, चांदीचा भावही वधारला; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली: आज सलग सातव्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. वाढत्या किमतींमुळे सोन्याने पुन्हा एकदा विक्रमी पातळी गाठली आहे. सध्या तोळ्यामागे सोन्याचा भाव 50 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात 0.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

2020 मध्ये सोन्याचा दर 56,000 च्या वर गेला
7 फेब्रुवारीला मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव आज 0.19 टक्क्यांनी वाढून 48,014 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला होता. आजचा सोन्याचा भाव 51,415 रुपये आहे. हा भाव विविध शहरांमध्ये कमी-जास्त असू शकतो. 2020 मध्ये MCX वर सोन्याच्या किमतीत जोरदार वाढ झाली होती. ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीने 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती.

जाणून घ्या आजचा भाव
एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 50 हजारांच्या पुढे गेला आहे. आज सोन्याचा दर 51,415 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. दुसरीकडे, चांदी 0.46 टक्क्यांच्या वाढीसह 64,529 रुपये प्रति किलोच्या पातळीवर आहे.
 

Web Title: Gold and Silver Rate: Gold has risen by Rs 2,200 in the last seven days, find out today's price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.