Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोना संसर्गाचा चांदी अन् सोन्याला मोठा फटका; चार महिन्यांतील नीचांकी दरांची नोंद

कोरोना संसर्गाचा चांदी अन् सोन्याला मोठा फटका; चार महिन्यांतील नीचांकी दरांची नोंद

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सोने-चांदीचे भाव वाढत होते. त्यानंतर मात्र किरकोळ चढ-उतार सुरूच होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 06:51 AM2021-08-10T06:51:49+5:302021-08-10T06:52:16+5:30

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सोने-चांदीचे भाव वाढत होते. त्यानंतर मात्र किरकोळ चढ-उतार सुरूच होता.

gold and silver rate slips as corona infection increases worldwide | कोरोना संसर्गाचा चांदी अन् सोन्याला मोठा फटका; चार महिन्यांतील नीचांकी दरांची नोंद

कोरोना संसर्गाचा चांदी अन् सोन्याला मोठा फटका; चार महिन्यांतील नीचांकी दरांची नोंद

- विजयकुमार सैतवाल

जळगाव : विविध देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढून आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीच्या मागणीवर परिणाम होऊन त्यांचे भाव कमी होत आहे.  सोमवारी चांदीत दोन हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ६६ हजार ५०० रुपये प्रतिकिलो झाली. सोन्याच्याही भावात एक हजार ३०० रुपयांची घसरण होऊन ते ४७ हजार ४०० रुपये प्रतितोळ्यावर आले. चार महिन्यातील सोने-चांदीमधील ही घसरण नीचांकी आहे. 

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सोने-चांदीचे भाव वाढत होते. त्यानंतर मात्र किरकोळ चढ-उतार सुरूच होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून ६९ हजार ५०० रुपयावर असलेल्या चांदीच्या भावात ६ ऑगस्ट रोजी ५०० रुपयाची घसरण होऊन ती ६९ हजार रुपयावर आली होती. यामुळे खरेदीचे प्रमाण  काही प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उतरता आलेख 
५ मार्च २०२१ रोजी चांदीत दोन हजार रुपयांची, तर सोन्याच्या भावात ५०० रुपयांची घसरण झाली होती. त्यापूर्वी  ४ मार्च २०२१ रोजीदेखील चांदीत एक हजार ५००, तर सोन्यात ७०० रुपयांची घसरण झाली होती. २७ मे रोजी चांदीत एक हजार ३००, तर सोन्यात ६०० रुपयांची घसरण झाली होती.

कोरोना संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीच्या मागणीवर परिणाम होत असल्याने, त्यांचे भाव कमी होत आहे. सोमवारी त्यामुळेच आपल्याकडेही भाव कमी झाले.
- सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक, जळगाव

Web Title: gold and silver rate slips as corona infection increases worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.