Join us

कोरोना संसर्गाचा चांदी अन् सोन्याला मोठा फटका; चार महिन्यांतील नीचांकी दरांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 6:51 AM

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सोने-चांदीचे भाव वाढत होते. त्यानंतर मात्र किरकोळ चढ-उतार सुरूच होता.

- विजयकुमार सैतवालजळगाव : विविध देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढून आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीच्या मागणीवर परिणाम होऊन त्यांचे भाव कमी होत आहे.  सोमवारी चांदीत दोन हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ६६ हजार ५०० रुपये प्रतिकिलो झाली. सोन्याच्याही भावात एक हजार ३०० रुपयांची घसरण होऊन ते ४७ हजार ४०० रुपये प्रतितोळ्यावर आले. चार महिन्यातील सोने-चांदीमधील ही घसरण नीचांकी आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सोने-चांदीचे भाव वाढत होते. त्यानंतर मात्र किरकोळ चढ-उतार सुरूच होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून ६९ हजार ५०० रुपयावर असलेल्या चांदीच्या भावात ६ ऑगस्ट रोजी ५०० रुपयाची घसरण होऊन ती ६९ हजार रुपयावर आली होती. यामुळे खरेदीचे प्रमाण  काही प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.उतरता आलेख ५ मार्च २०२१ रोजी चांदीत दोन हजार रुपयांची, तर सोन्याच्या भावात ५०० रुपयांची घसरण झाली होती. त्यापूर्वी  ४ मार्च २०२१ रोजीदेखील चांदीत एक हजार ५००, तर सोन्यात ७०० रुपयांची घसरण झाली होती. २७ मे रोजी चांदीत एक हजार ३००, तर सोन्यात ६०० रुपयांची घसरण झाली होती.कोरोना संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीच्या मागणीवर परिणाम होत असल्याने, त्यांचे भाव कमी होत आहे. सोमवारी त्यामुळेच आपल्याकडेही भाव कमी झाले.- सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक, जळगाव

टॅग्स :सोनंचांदी