Gold Silver Price 1 August: सोन्या-चांदीच्या दरात आजही मोठी वाढ झाली आहे. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ५९६ रुपयांनी वाढून ६९९०५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर दुसरीकजे आज एक किलो चांदीचा भाव ५६८ रुपयांनी वाढून ८३५४२ रुपये झालाय. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात १,१११ रुपयांनी तर चांदीच्या दरात १,३५० रुपयांची वाढ झाली. बजेटमध्ये कस्टम ड्युटीच्या घोषणेनंतर ज्या प्रकारे सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली, त्याच पद्धतीने आता त्यात पुन्हा वाढ होत आहे.
आयबीजेएनं जाहीर केलेल्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ५९४ रुपयांनी वाढून ६९६२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५४६ रुपये प्रति १० ग्रॅम ने वाढून ६४०३३ रुपये झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ४४७ रुपयांनी वाढून ५२४२९ रुपये झाला आहे. आज १४ कॅरेट सोन्याचा भाव ३४८ रुपयांनी वाढून ४०८९४ रुपये झाला आहे.
सोन्या-चांदीच्या दरात वाढ का?
केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक्निकल सेटअप आणि कप अँड हँडल पॅटर्नमुळे सोनं २,७०० डॉलर्स प्रति औंसचं लक्ष्य गाठू शकतं. येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात सोनं ७७००० ते ७७५०० चा टप्पा गाठू शकतं. जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी सुरूच ठेवतात. भूराजकीय तणाव कायम आहे. आता इस्रायल आणि इराणमधील तणाव सोन्याच्या किंमतीसाठी टेन्शन देणारा ठरत आहे.
जीएसटीसह सोन्याचे दर
२४ कॅरेट सोन्याचा भाव आता ३ टक्के जीएसटीसह ७२,००२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याचा भाव ७१७१३ रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ६५९५३ रुपये झाला आहे. जीएसटीसह १८ कॅरेट सोन्याची किंमत ५४,००१ रुपये आहे. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा धरण्यात आलेला नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ८६०४८ रुपयांवर पोहोचलाय.
टीप : सोन्या-चांदीचे हे दर आयबीजेएनं जारी केले आहेत. त्यावर दागिनं बनविण्याचं कोणतेही शुल्क आकारलं जात नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असू शकतो.