Join us

लग्नसराईच्या मागणीने सोने-चांदी वधारले

By admin | Published: February 10, 2015 11:11 PM

दोन सत्रांच्या घसरणीनंतर मंगळवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली. लग्नसराईच्या मागणीचा लाभ

नवी दिल्ली : दोन सत्रांच्या घसरणीनंतर मंगळवारी राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली. लग्नसराईच्या मागणीचा लाभ मिळाल्याने सोने ९0 रुपयांनी वाढून २७,८८0 रुपये तोळा झाले. ५७0 रुपयांनी वाढलेली चांदी ३८,१00 रुपये किलो झाली.सिंगापूरमधील बाजारात सोन्याचा भाव 0.६ टक्क्याने वाढून १,२४५.९८ डॉलर प्रतिऔंस झाला. 0.४ टक्क्याने वाढलेली चांदी १७.0६ डॉलर प्रतिऔंस झाली. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव ९0 रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,८८0 रुपये आणि २७,६८0 रुपये तोळा झाला. गेल्या दोन सत्रांत सोन्याच्या भावात ५१0 रुपयांची घसरण झाली होती. सोन्याच्या आठ ग्रॅमच्या गिन्नीचा भाव मात्र आदल्या दिवशीच्या पातळीवर २३,९00 रुपये असा स्थिर राहिला. तयार चांदीचा भाव ५७0 रुपयांनी वाढून ३८,१00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ५६५ रुपयांनी वाढून ३७,७१५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव मात्र आदल्या दिवशीच्या पातळीवर खरेदीसाठी ६१ हजार रुपये, तर विक्रीसाठी ६२ हजार रुपये शेकडा असा कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)