Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्या-चांदीची चमक झाली फिकी

सोन्या-चांदीची चमक झाली फिकी

जागतिक बाजारात असलेली निराशाजनक स्थिती आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडून घटलेली मागणी यामुळे सोने आणि चांदी या दोन्ही धातूंचे भाव मंगळवारी घसरले.

By admin | Published: October 14, 2015 12:35 AM2015-10-14T00:35:56+5:302015-10-14T00:35:56+5:30

जागतिक बाजारात असलेली निराशाजनक स्थिती आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडून घटलेली मागणी यामुळे सोने आणि चांदी या दोन्ही धातूंचे भाव मंगळवारी घसरले.

Gold and silver shine | सोन्या-चांदीची चमक झाली फिकी

सोन्या-चांदीची चमक झाली फिकी

नवी दिल्ली : जागतिक बाजारात असलेली निराशाजनक स्थिती आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडून घटलेली मागणी यामुळे सोने आणि चांदी या दोन्ही धातूंचे भाव मंगळवारी घसरले. गेल्या २ सत्रात सोने २७० रुपयांनी वधारले होते.
सोने दहा ग्रॅममध्ये ७० रुपयांनी घसरून २६,८०० वर तर चांदी प्रति किलोमागे २०० रुपयांनी घसरून ३६,८०० रुपयांवर आली. औद्योगिक युनिट आणि नाणे उत्पादकांकडून मागणी नसल्याने चांदीचे भाव घसरले.
काही दिवसांपूर्वीच सोन्याने सात आठवड्यातील उच्चांक गाठला होता, पण जवाहिऱ्यांकडून मागणी नसल्याने सोन्याचे भाव घटल्याचे व्यापारी विश्लेषकांनी सांगितले. साधारणपणे सिंगापुरात सोन्याच्या भावाचा कल दिसून येतो. तेथे जागतिक स्तरावर सोन्याचा भाव ०.९ टक्क्यांनी घटून १,१५३.०५ डॉलर प्रति औंस असा झाला. चांदीही ०.७ टक्क्यांनी घसरून १५.७१ डॉलर प्रति औंस अशी झाली. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही सोन्याचे भाव ७० टक्क्यांनी घसरून अनुक्रमे २६,८०० आणि २६,६५० रुपये प्रति १० ग्रॅम असे झाले. चांदीच्या नाण्याचे भावही एक हजार रुपयांनी घसरले.

Web Title: Gold and silver shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.