Join us

सोने-चांदी घसरले

By admin | Published: October 15, 2016 1:09 AM

सोन्या-चांदीच्या भावात शुक्रवारी घसरण झाली. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने १00 रुपयांनी घसरून ३0,३00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या भावात शुक्रवारी घसरण झाली. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने १00 रुपयांनी घसरून ३0,३00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदी २७५ रुपयांनी घसरून ४२,३५0 रुपये किलो झाली.जागतिक बाजारातीर नरमाई आणि ज्वेलर्स तसेच किरकोळ व्यापाऱ्यांचा खरेदीतील आखडता हात यामुळे बाजार खाली आल्याचे सूत्रांनी सांगितले. सिंगापूरच्या बाजारात सोने 0.२१ टक्क्यांनी घसरून १,२५५.१0 डॉलर प्रति औंस झाले. चांदीही 0.१४ टक्क्यांनी घसरून १७.४४ डॉलर प्रति औंस झाली. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रत्येकी १00 रुपयांनी घसरून अनुक्रमे ३0,३00 रुपये आणि ३0,१५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. काल सोने २५0 रुपयांनी वाढले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,३00 रुपयांवर स्थिर राहिला.तयार चांदीचा भाव २७५ रुपये घसरून ४२,३५0 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव २८0 रुपयांनी घसरून ४१,९५0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजार रुपयांनी घसरून खरेदीसाठी ७२ हजार रुपये व विक्रीसाठी ७३ हजार रुपये प्रति शेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)