Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिवाळीच्या खरेदीने सोने, चांदीला मिळाली झळाळी

दिवाळीच्या खरेदीने सोने, चांदीला मिळाली झळाळी

दिवाळीच्या मुहूर्ताला खरेदीचा जोर वाढल्याने राजधानी दिल्ली सराफा बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशीही सोने आणि चांदी झळाळली.

By admin | Published: November 11, 2015 11:26 PM2015-11-11T23:26:32+5:302015-11-12T03:45:13+5:30

दिवाळीच्या मुहूर्ताला खरेदीचा जोर वाढल्याने राजधानी दिल्ली सराफा बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशीही सोने आणि चांदी झळाळली.

Gold and silver were received by Diwali | दिवाळीच्या खरेदीने सोने, चांदीला मिळाली झळाळी

दिवाळीच्या खरेदीने सोने, चांदीला मिळाली झळाळी

नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्ताला खरेदीचा जोर वाढल्याने राजधानी दिल्ली सराफा बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशीही सोने आणि चांदी झळाळली. सणासुदीमुळे दागदागिने विक्रेत्यांनी खरेदीवर भर दिल्याने दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव १५ रुपयांनी वाढून २६,२५० रुपयांवर (प्रति दहा ग्रॅम) गेला.
हिंदू संवत वर्ष २०७२ ची सुरुवात आणि दिवाळीमुळे सराफा व्यापाऱ्यांनी खरेदीवर भर दिला. तसेच या क्षेत्रातील उद्योग आणि नाणे तयार करणाऱ्यांनीही खरेदी केल्याने २५ रुपयांनी चांदीची झळाळी
वाढली.
राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचा भाव दिवसअखेर ३४,९०० रुपयांवर (प्रति किलो) गेला. गेल्या दोन दिवसांत सोन्याचे भाव १२५ रुपयांनी वाढले होते. लंडनमध्ये सोन्याचा भाव ०.२ टक्क्याने कमी होत प्रति औंस १,०८७.७० डॉलरवर आला.
तयार चांदीचा भाव २५ रुपयांनी वाडून ३४,९00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव मात्र २५0 रुपयांनी घसरून ३४,२७0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ४८ हजार रुपये आणि विक्रीसाठी ४९ हजार रुपये असा स्थिर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold and silver were received by Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.