देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नेमकं याच पार्श्वभूमीवर आज सोनं आणि चांदीच्या दरातची घट झाली आहे. सोन्याचा दर ५०० रुपये तर चांदीच्या दरात १७०० रुपयांची घसरण झाली आहे.
मुंबईत सोन्याचा भाव आता ४७ हजार ९१० रुपयांवर आला आहे. तर चांदीचा दर एका किलोमागे ६४,९८० रुपये इतका झाला आहे. कोरोना लसीकरण आणि अमेरिकेतील राजकीय अस्थिरता निवळल्याचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण सुरूच आहे. MCX च्या माहितीनुसार, गुरुवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रम ४९,२२१ रुपयांवर बंद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यात १३३ रुपयांची घसरण होऊन ४९,०८८ रुपये इतका झाला होता. त्यानंतर सोन्याच्या भावात किंचत वाढ होऊन ४९,१४५ रुपये इतका झाला होता.
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम मागे ४७,९१० रुपये इतका झाला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८,९१० रुपये इतका झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६०८० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५०२७० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८४१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१११० रुपये आहे.