सोन्याचे दर सातत्याने घसरताना दिसत आहेत. ऑगस्ट महिन्यात सोने आणि चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेन्जवर सोन्याचा भाव (MCX Gold Price) सातत्याने घसरताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर आतापर्यंत 1300 रुपयांनी घसरला आहे. तर चांदीही 5600 रुपयांची स्वस्त झाली आहे.
MCX वर किती घसरलं सोनं-चांदी? -
MCX वर सोन्याचा दर 100 रुपयांनी घसरून 58769 वर आला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेन्जवर सोन्याचा दर 59,000 रुपयांच्याचीह खाली गेला आहे. याच प्रकारे चांदीच्या किंमतीतही 125 रुपयांची घसरण दिसून आली आहे. MCX वर एक किलोग्रॅम चांदी 69855 रुपयांवर ट्रेड करत आहे.
कशी झाली 1300 रुपयांची घसरण -
सोन्याचा भाव 31 जुलैला 60082 रुपयांवर होता. आज सोन्याचा दर 58740 रुपयांवर आला आहे. यानुसार, सोन्याचा दर आतापर्यंत 1342 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला आहे.
ग्लोबल मार्केटमध्य सोन्या-चांदीचा दर -
आंतरराष्ट्रीय बाजारासंदर्भात बोलायचे झाल्यास, अमेरिकेतील महागाईचे आकडे समोर आल्यापासूनच ग्लोबल मार्केटमध्ये चढ उतार बघायला मिळत आहे. या दरम्यान सोन्या चांदीच्या दरात कमी आल्याचे दिसत आहे. कॉमॅक्सवर सोन्याचा दर 1944 डॉलर प्रति औंस, तर चांदी 22.70 डॉलर प्रति औंसव आहे.
लक्षात असू द्या ही महत्वाची गोष्ट -
जर आपण सोनं खरेदीसाठी बाजारात जात असाल तर हॉलमार्क बघूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी आपण सरकारी अॅपचाही वापर करू शकता. ‘BIS Care app’ च्या माध्यमाने आपण सोन्याची शुद्धता चेक करू शकता. याशिवाय याच अॅपच्या माध्यमाने आपण तक्रारही करू शकता.