Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने २७ हजाराच्या खाली; दोन आठवड्यातील नीचांक

सोने २७ हजाराच्या खाली; दोन आठवड्यातील नीचांक

जवाहिऱ्यांकडून मागणी घटल्याने सोन्याचे भाव शुक्रवारी आणखी २४५ रुपयांनी घसरून २७ हजाराच्या खाली गेले. शुक्रवारी येथील बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २६,८३० रुपये झाला.

By admin | Published: October 30, 2015 09:43 PM2015-10-30T21:43:37+5:302015-10-30T21:43:37+5:30

जवाहिऱ्यांकडून मागणी घटल्याने सोन्याचे भाव शुक्रवारी आणखी २४५ रुपयांनी घसरून २७ हजाराच्या खाली गेले. शुक्रवारी येथील बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २६,८३० रुपये झाला.

Gold below 27 thousand; Two week low | सोने २७ हजाराच्या खाली; दोन आठवड्यातील नीचांक

सोने २७ हजाराच्या खाली; दोन आठवड्यातील नीचांक

नवी दिल्ली : जवाहिऱ्यांकडून मागणी घटल्याने सोन्याचे भाव शुक्रवारी आणखी २४५ रुपयांनी घसरून २७ हजाराच्या खाली गेले. शुक्रवारी येथील बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २६,८३० रुपये झाला. गेल्या दोन आठवड्यातील हा नीचांक आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचे भावही ७३५ रुपयांनी घसरले.
औद्योगिक कारखाने आणि नाणे उत्पादकांकडून मागणी घटल्याने चांदीचे भावही किलोमागे ७३५ रुपयांनी घसरून ३७ हजारांच्या खाली जात ३६,६३० रुपये झाले.
जागतिक स्तरावर सोन्याचे भाव ०.८८ टक्क्यांनी घसरले. न्यूयॉर्क येथील बाजारात सोन्याचा भाव ११४५.५० डॉलर प्रति औंस असा झाला.
चांदीचे भावही २.२३ टक्क्यांनी घसरून १५.५८ डॉलर प्रति औंस झाला.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही सोन्याचे भाव दहा ग्रॅममागे २४५ रुपयांनी घसरून अनुक्रमे २६,८३० रुपये आणि २६,६८० रुपये झाले. यापूर्वी १३ आॅक्टोबर रोजी सोन्याचे हे भाव होते. गुरुवारीच सोने १९० रुपयांनी घसरले होते. (लोकतम न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold below 27 thousand; Two week low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.