नवी दिल्ली : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे, बुधवारी सराफा बाजारात मोठी पडझड झाली. राजधानी दिल्लीत सोने तोळ्यामागे ७३0 रुपयांनी घसरून ३१ हजार रुपयांच्या खाली आले. चांदी किलोमागे तब्बल १,७५0 रुपयांनी आपटून ४४ हजार रुपयांच्या खाली घसरली.
दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेचे सोने ७३0 रुपयांनी घसरून ३0,५२0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. ९९.५ टक्के शुद्धतेचे सोनेही ७३0 रुपयांनी घसरून ३0,३७0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. ही या वर्षातील सर्वांत मोठी एकदिवशीय घसरण ठरली, तसेच १८ जुलैनंतरचा हा नीचांकी बंद ठरला. काल सोने ५0 रुपयांनी वाढले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव १५0 रुपयांनी घसरून २४,३५0 रुपये प्रति नग झाला.
जागतिक बाजारांत जूननंतर सोने प्रथमच १,३00 डॉलरच्या खाली गेले. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्यामुळे, फेडरल रिझर्व्हकडून लवकरच व्याजदर वाढविले जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जगातील सर्व प्रमुख ठिकाणचे सराफा बाजार उतरले. डॉलर मजबूत झाल्याचा हा परिणाम आहे, असे जाणकारांनी सांगितले. न्यूयॉर्क येथील बाजारात काल सोने ३.२६ टक्क्यांनी घसरून १,२६८.४0 डॉलर प्रति औंस झाले. चांदी ५.३८ टक्क्यांनी घसरून १७.७८ डॉलर प्रति औंस झाली. दिल्लीत तयार चांदीचा भाव १,७५0 रुपयांनी घसरून ४३,२५0 रुपये किलो, तर साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १,९७५ रुपयांनी घसरून ४३,0६0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव ३ हजार रुपयांनी घसरून खरेदीसाठी ७४ हजार रुपये आणि विक्रीसाठी
७५ हजार रुपये प्रति शेकडा असा झाला. (लोकमत न्यूज नेटकर्वक)
सेन्सेक्स ११४ अंकांनी घसरला
1युरोपीय केंद्रीय बँकेकडून प्रोत्साहन पॅकेज मागे घेतले जाणार असल्याच्या वृत्तामुळे, युरोपीय बाजारांत आलेल्या भूकंपामुळे भारतीय बाजारांनाही बुधवारी हादरे बसले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे ११४ अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे २0 अंकांनी खाली आला.
2सेन्सेक्स काल ९१ अंकांनी वाढला होता, तसेच आधीच्या सत्रात ५0७.0२ अंकांची वाढ त्याने मिळविली होती. आज मात्र, या तेजीला धक्का बसला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ११३.५७ अंकांनी अथवा 0.४0 टक्क्यांनी घसरून २८,२२0.९८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५.२0 अंकांनी अथवा 0.२९ टक्क्यांनी घसरून ८,७४३.९५ अंकांवर बंद झाला.
च्सेन्सेक्समधील कंपन्यांना प्रामुख्याने नफा
वसुलीचा फटका बसल्याचे सांगण्यात आले. ओएनजीसी २.५६ टक्क्यांनी, तसेच अॅक्सिस
बँक यांचे समभाग २.0३ टक्क्यांनी घसरले. घसरगुंडीचा फटका बसलेल्या बड्या कंपन्यांत बजाज आॅटो, हीरो मोटोकॉर्प, एमअँडए, डॉ. रेड्डीज, आयसीआयसीआय बँक, अदाणी पोर्ट्स, टीसीएस यांचा समावेश आहे. सेन्सेक्समधील ३0 पैकी १९ कंपन्यांचे समभाग घसरले.
च्११ कंपन्यांचे समभाग वाढले. व्यापक बाजारांत मात्र तेजी पाहायला मिळाली. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.६२ टक्क्यांनी, तर मीडकॅप
0.५0 टक्क्यांनी वाढला.
सोने ३१ हजारांखाली
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे, बुधवारी सराफा बाजारात मोठी पडझड झाली.
By admin | Published: October 6, 2016 05:55 AM2016-10-06T05:55:53+5:302016-10-06T05:55:53+5:30