Join us

काय सांगता! १० ग्रॅम सोन्याचे फक्त ९९ रुपये, दर पाहून नेटकरी चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 1:46 PM

सध्या सोन्या, चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. नव्या वर्षात सोन्याचे दराने पुन्हा रेकॉर्ड मोडले आहे.  ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा दर ५६,२०० रुपयांवर जावून रेकॉर्ड बनवले होते.

सध्या सोन्या, चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. नव्या वर्षात सोन्याचे दराने पुन्हा रेकॉर्ड मोडले आहे.  ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा दर ५६,२०० रुपयांवर जावून रेकॉर्ड बनवले होते. काल मंगळवारी बंद झालेल्या बाजारात सोनं ५५,५८१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. येणाऱ्या काही दिवसात सोनं ६२,००० रुपयांवर जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर चांदीचे दर ८०,००० रुपये प्रति किलोवर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे, या पार्श्वभूमिवर आता सोशल मीडियावर स्वातंत्र्य काळातील सोन्याचे बील व्हायरल झाले आहे. 

मागिल काही दिवसापासून सोशल मीडियावर जुन्या काळाती बील व्हायरल होत आहेत. काही दिवसापूर्वी बुलेटचे बील व्हायरल झाले होते, त्याकाळी बुलेट फक्त १६ हजार रुपयांना मिळत होती. आता हीच बुलेट २ लाखांना मिळते. आता सोन्याचे बील व्हायरल झाले आहे. हे बील १९५९ सालचे आहे. या बीलात सोने आणि चांदी या दोन्हीचे दर आहेत, यातील सोन्याचे दर पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

स्वातंत्र्य काळातील 1950 मध्ये सोन्याचा दर 99 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.वया बीलमध्ये सोने 113 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर होते, असं दिसत. एका वर्षानंतर सोन्याचा दर 112 रुपये प्रति 10 ग्रॅम असल्याचे म्हटले आहे. 1970 मध्ये हा दर वाढून 184.50 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

व्हायरल होत असलेल्या 1959 च्या या बिलात 621 आणि 251 रुपयांच्या सोन्याच्या वस्तूंचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय 12 रुपयांची चांदी आणि 9 रुपयांची इतर वस्तू आहेत. एकूण बिल 909 रुपये आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या विधेयकाची स्थितीही अतिशय वाईट दिसत आहे. या विधेयकात कराचाही उल्लेख करण्यात आला आहे. पण ते पूर्णपणे हाताने लिहिलेले आहे.

कमाल! फिजिक्सच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याने लिहीली चक्क बॉलिवूडची गाणी; शिक्षकांनी शेअर केला उत्तरपत्रिकेचा व्हिडिओ

स्वातंत्र्यानंतर सोन्याचे दर 1950-99 रुपये प्रति 10 ग्रॅम, 1960-112 रुपये प्रति 10 ग्रॅम, 1970-184.5 रुपये प्रति 10 ग्रॅम, 1980-1330 रुपये प्रति 10 ग्रॅम, 1990-3200 रुपये प्रति 10 ग्रॅम, 2000-4400 रुपये प्रति 10 ग्रॅम, 2010-18, 500 रुपये प्रति 10 ग्रॅम, 2020-56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम, 2022-55000 रुपये प्रति 10 ग्रॅम असे दर होते. 

टॅग्स :सोनंसोशल व्हायरलचांदी