लोकमत न्यूज नेटवर्क : नवी दिल्ली : देशातील सार्वभौम सुवर्ण रोख्यांची पहिली मालिका (२०१५-१६ मालिका १) येत्या ३० नोव्हेंबर रोजी परिपक्व होत आहे. या मालिकेतील रोखे रिडिम केल्यास सुमारे १२८ टक्के परतावा मिळू शकतो.नियमानुसार सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या पहिल्या ९ मालिकांसाठी रिडेम्पशनची किंमत ही परिपक्वता तारखेच्या आधीच्या सप्ताहातील (सोमवार ते शुक्रवार) ‘आयबीजेए’मधून प्राप्त ९९९ शुद्धतेच्या सोन्याची सरासरी बंद किमतीएवढी असेल. त्यानंतरच्या मालिकांसाठी ती परिपक्वता तारखेच्या आधीच्या ३ कार्य दिवसातील बंद किमतीएवढी असेल.
पहिली मालिका ३० नोव्हेंबर, गुरुवारी परिपक्व होत आहे. त्यामुळे २० ते २४ नोव्हेंबर या दिवसांच्या बंद किमतीची सरासरी ही या मालिकेची रिडेम्पशन किंमत असेल.
रिडम्पशनची किंमत किती असेल?nदेशातील पहिले सार्वभौम सुवर्ण रोखे २,६८४ रुपयांच्या ‘इश्यू प्राइस’वर २६ नोव्हेंबर २०१५ रोजी जारी झाले होते. या मालिकेत ९,१३,५७१ युनिट्स म्हणजेच ०.९१ टन सोन्याच्या किमतीएवढे रोखे विकले गेले होते.nत्यांची लिस्टिंग १३ जून २०१६ रोजी झाले होते. सध्या ‘आयबीजेए’वर सोन्याची किंमत ६,१३५ रुपये प्रतिग्रॅम आहे. त्याच्या आसपासच रोख्याची रिडेम्पशन किंमत निश्चित होईल. त्यानुसार या मालिकेवर १२८ टक्के अधिक परतावा मिळू शकतो.