Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याच्या भावाला नवी चमक

सोन्याच्या भावाला नवी चमक

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी ताजी खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी सोन्याच्या भावाला नवी झळाळी मिळाली.

By admin | Published: June 30, 2015 02:19 AM2015-06-30T02:19:00+5:302015-06-30T02:19:00+5:30

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी ताजी खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी सोन्याच्या भावाला नवी झळाळी मिळाली.

Gold brother's new shine | सोन्याच्या भावाला नवी चमक

सोन्याच्या भावाला नवी चमक

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी ताजी खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी सोन्याच्या भावाला नवी झळाळी मिळाली. आज सोन्याचा भाव २४० रुपयांनी वधारून २६,९५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी वाढल्याने चांदीचा भावही ३०० रुपयांनी उंचावून ३६,७०० रुपये प्रतिकिलोवर राहिला.
जाणकारांनी सांगितले की, ग्रीक संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक गुंतवणूकदारांत भीतीचे वातावरण आहे. शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सराफा बाजाराला पसंती मिळाली.
लंडन येथे सोन्याचा भाव १.१ टक्क्यांनी वाढून १,१८८.२३ डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव १.७ टक्क्यांनी उंचावून १६.०७ डॉलर प्रतिऔंस झाला. तयार चांदीचा भाव आणखी ३०० रुपयांच्या सुधारणेसह ३६,७०० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ४१५ रुपयांनी वाढून ३६,३८० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५४,००० रुपये व विक्रीकरिता ५५,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold brother's new shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.