नवी दिल्ली : जागतिक बाजारात मिळालेला उठाव आणि त्यामुळे स्थानिक सराफांनी केलेली जोरदार खरेदी यामुळे सोने मंगळवारी २२५ रुपयांनी वधारून २५,८४० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. त्याचप्रमाणे औद्योगिक प्रकल्प आणि नाणे निर्मात्याकडून मागणी वाढल्याने चांदीही ७५ रुपयांनी वधारून ३३,७०० रुपये प्रति किलो झाली.सिंगापूर आणि लंडन येथील या कलाचा परिणाम भारतीय बाजारात झाला आणि सराफांनी जोरदार खरेदी केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ ते ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचे भाव २२५ रुपयांनी वाढून २५,८४० रुपये आणि २५,६९० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. सोमवारी सोने १९५ रुपयांनी वधारले होते.सोन्याप्रमाणेच चांदीलाही मागणी होती, त्यामुळे चांदी ७५ रुपयांनी वधारून ३३,७०० रुपये प्रति किलो झाली. चांदीच्या नाण्याचे भावही एक हजार रुपयांनी वधारले. १०० नाण्यांच्या खरेदीचा दर ४८ हजार रुपये, तर विक्रीचा दर ४९ हजार रुपये झाला.
सराफांच्या खरेदीने सोन्यात तेजी
By admin | Published: January 05, 2016 11:47 PM