Join us  

RBI Gold Purchase : जगभरात सोनं खरेदीची स्पर्धा! RBI नं खरेदी केलं सर्वाधिक सोनं; आकडा जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 10:56 AM

RBI Gold Purchase : या बँकांनी या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तब्बल 483 टन एवढे सोने खरेदी केले. खरे तर, हा एक नवा विक्रम आहे. 2023 चा विचार करता, जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत या बँकांनी 460 टन सोने खरेदी केले होते.

जगभरात सुरू असलेल्या भू-राजकीय तणावादरम्यानच जगातील अेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याच्या खरेदीत लक्षणीय वाढ केली आहे. सध्या सर्वच देशांच्या मध्यवर्ती बँकांमध्ये आपापल्या तिजोरीतील सोन्याचा साठा वाढवण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याचे दिसत आहे. या बाबतीत, एप्रिल-जून 2024 मध्ये RBI संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे.

या बँकांनी या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तब्बल 483 टन एवढे सोने खरेदी केले. खरे तर, हा एक नवा विक्रम आहे. 2023 चा विचार करता, जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत या बँकांनी 460 टन सोने खरेदी केले होते. अर्थात या तुलनेत, या वरर्षाच्या पहिल्या सहामाहीत 5 टक्के अधिक सोने खरेदी केले गेले आहे.

RBI नं सर्वाधिक सोनं खरेदी केलं -या वर्षातील पहिल्या दोन तिमाहींचा विचार करता, 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत जगभरातील मध्यवर्ती बँकांनी 183 टन सोनं खरेदी केले. हे प्रमाण एप्रिल-जूनच्या तुलनेत सहा टक्क्यांनी अधिक आहे. मात्र यापूर्वी, जानेवारी-मार्च तिमाहीत मध्यवर्ती बँकांनी 300 टन सोने खरेदी केले होते.

सोने खरेदीच्या डेटानुसार, वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत नॅशनल बँक ऑफ पोलंड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. या दोन्ही बँकांनी 19-19 टन सोने खरेदी केले आहे. याशिवाय, सेंट्रल बँक ऑफ टर्की 15 टन सोने खरेदी करत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यांनी वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 45 टन सोने खरेदी केले आहे. 

तसेच, जॉर्डन, कतार, रशिया, उझबेकिस्तान, किरगिझस्तान, इराक आणि झेक प्रजासत्ताकच्या मध्यवर्ती बँकांनीही दुसऱ्या तिमाहीत मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले आहे. मात्र, याचवेळी चीनच्या मध्यवर्ती बँकेने सोन्याची खरेदी कमी केली आहे.

टॅग्स :सोनंभारतीय रिझर्व्ह बँकबँकभारत