Join us

1 रुपयात इथे खरेदी करू शकता सोनं! जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 10:30 AM

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.

नवी दिल्ली- अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. या साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्ताला सोनं खरेदी केल्यास घरात संपन्नता येते, अशी लोकांची धारणा आहे. विशेष म्हणजे आजच्या जमान्यात एक रुपयांतही आपण सोनं खरेदी करू शकता. ऑनलाइन कंपन्या या योजनेंतर्गत ग्राहकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे साहजिकच सोन्याची मागणीदेखील वाढणार आहे. 

  • 1 रुपयात खरेदी करा सोनं- ई-वॉलेटमधली अग्रगण्य कंपनीनं असलेल्या पेटीएमनं पेटीएम गोल्ड सर्व्हिस सुरू केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून फक्त 1 रुपयात आपण सोनं खरेदी करू शकता. इथे आपण 1 रुपयापासून दीड लाख रुपयांपर्यंत सोने खरेदी करू शकता. कंपनीनं हे सोनं 24 कॅरेट 999.9 शुद्ध असल्याचाही दावा केला आहे. आपण खरेदी केलेलनं सोनं कंपनी सुरक्षित लॉकरमध्ये ठेवणार आहे. जर आपल्याला हवे असल्यास ते सोनं घरपोचसुद्धा पोहोचवलं जातं. 

 

  • असे खरेदी करा- पेटीएम गोल्डवरून सोनं खरेदी करण्यासाठी आपल्याला पेटीएम अॅपवर गोल्ड ऑप्शनवर क्लिक करावं लागणार आहे. इथे आपण सोनं खरेदी करू शकता. आपलं सोनं एमएटीसी-पीएमपीच्या लॉकरमध्ये सुरक्षित राहील. इथे सोनं खरेदी करून पुन्हा विकताही येते. पेटीएम गोल्डच्या शुद्धतेची 100 टक्के खात्री दिली जाते. एक ग्रॅम सोनं जमा झाल्यास आपल्याला डिलिव्हरी देण्यात येणार आहे. डिलिव्हरीमध्ये 1, 2, 5, 10, 20 ग्रॅमची सोन्याची नाणी मिळतात. तसेच पेटीएम आपल्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल ट्रान्झॅक्शन करण्याबरोबरच कॅशबॅकच्या स्वरूपात डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचाही पर्याय देते. पेटीएम गोल्डऐवजी बुलियन इंडियाच्या माध्यमातूनही आपण सोनं खरेदी करू शकता. परंतु ते कमीत कमी 300 रुपयांचं पाहिजे. फिनकर्व्ह बुलियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची उपकंपनी बुलियन इंडियासुद्धा एमएमटीसी-पीएएमपीसारखंच स्वतःचं सोनं सुरक्षित लॉकरमध्ये ठेवते.
  • ईटीएफचा पर्याय- जर आपल्याला फिजिकल गोल्ड खरेदी करायचे नाहीत, तर ते सोनं ईटीएफमध्येही गुंतवता येते. गोल्ड ईटीएफ पेपर आणि इलेक्ट्रॉनिक दोन्हीद्वारे गुंतवता येतात. ईटीएफमध्ये गुंतवलेल्या सोन्यावर सूटही दिली जाते
टॅग्स :सोनं