Join us

‘करवा चौथ’च्या पूर्वसंध्येला सोने स्वस्त, प्रमुख शहरांतील दरांमध्ये लक्षणीय घट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 2:32 PM

पाहा काय होते सोन्याचे दर

उत्तर भारतीयांचा प्रसिद्ध ‘करवा चौथ’ हा सण बुधवारी १ नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज आहे. तत्पूर्वी  मंगळवारी देशातील सोने स्वस्त झाले. २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,५०० रुपये ते ५७,४०० रुपये प्रति १० ग्रॅम यादरम्यान राहिला. २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०० रुपये ते १,००० रुपयांनी कमी झाला आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव सरासरी ६२,००० रुपयांच्या आसपास राहिल्याचे दिसते. राजधानी दिल्लीत २२ कॅरेट सोने ५७,३५० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २४ कॅरेट सोने ६२,५४० रुपये प्रति १० ग्रॅम राहिले. चेन्नईत २२ कॅरेट सोने ५७,१५० रुपये, तर २४ कॅरेट सोने ६२,३५० रुपये प्रति १० ग्रॅम राहिले.  चांदीचे दर मात्र सरासरी ३०० रुपयांनी महागले आहेत. नवी दिल्लीत चांदीचे दर प्रतिकिलो ७५,००० रुपये इतके होते. 

विविध शहरांमध्ये  सोन्याचे दर (रुपयांमध्ये)शहर    २२ कॅरेट    २४ कॅरेटमुंबई    ५६,७००    ६१,८५०गुरुग्राम    ५७,३५०    ६२,८४०कोलकाता    ५६,७००    ६१,८५०लखनौ    ५७,३५०    ६२,५४०बंगळुरू    ५६,७००    ६१,८५०जयपूर    ५७,३५०    ६२,५४०पाटणा    ५६,७५०    ६१,९००भुवनेश्वर    ५६,७००    ६१,८५०हैदराबाद    ५६,७००    ६१,८५०

टॅग्स :सोनं