नवी दिल्ली : सोन्याचा भाव मंगळवारी १० ग्रॅममागे तब्बल ४५० रुपयांनी घसरून २५,७०० रुपयांवर आला. जागतिक बाजारातील मंदी आणि दागिने निर्मात्यांकडील घटलेल्या मागणीचा हा परिणाम असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सोन्याचा हा भाव गेल्या २० जुलै रोजी होता. चांदीही औद्योगिक क्षेत्रातून आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी घटल्यामुळे किलोमागे ५०० रुपयांनी स्वस्त होऊन ३४,१०० रुपयांवर आली.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करील या अपेक्षेने जागतिक बाजारातही सोन्याला मागणी कमी झाली व गुंतवणूक म्हणून सोन्याचे महत्त्व घटले व त्याच्या किमती खाली आल्या. जागतिक बाजारात गेल्या पाच वर्षांतील सगळ्यात कमी मागणी तेथे होती. सिंगापूरमधील बाजारात मंगळवारी सोने औंसमागे ०.४ टक्क्यांनी खाली येऊन १,०७८.०७ अमेरिकन डॉलर झाले.
सोमवारी न्यूयॉर्कच्या बाजारात त्याचा भाव औंसमागे ०.१७ टक्क्यांनी खाली येऊन १,०८२.१० अमेरिकन डॉलर होता. दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव १० ग्रॅममागे ४५० रुपयांनी स्वस्त होऊन २५,७०० व २५,५५० रुपये झाला. हा भाव २० जुलै रोजी होता. सोमवारच्या व्यवहारात सोने २३५ रुपयांनी महागले होते. आठ ग्रॅम सुवर्ण नाण्याचा भाव २२,२०० रुपये कायम राहिला. तयार चांदी किलोमागे ५०० रुपयांनी खाली येऊन ३४,१०० रुपये झाली तर वीकली बेस्ड् चांदी किलोमागे ६२० रुपयांनी खाली येऊन ३३,६४० रुपये झाली.
सोने ४५० रुपयांनी स्वस्त
सोन्याचा भाव मंगळवारी १० ग्रॅममागे तब्बल ४५० रुपयांनी घसरून २५,७०० रुपयांवर आला. जागतिक बाजारातील मंदी आणि दागिने निर्मात्यांकडील घटलेल्या मागणीचा हा परिणाम
By admin | Published: November 18, 2015 03:21 AM2015-11-18T03:21:08+5:302015-11-18T03:21:08+5:30