Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'ऑल-टाइम हाय'च्या जवळ पोहोचलं सोनं, कुठवर पोहोचू शकतो भाव? काय सांगतायत एक्सपर्ट्स? जाणून घ्या

'ऑल-टाइम हाय'च्या जवळ पोहोचलं सोनं, कुठवर पोहोचू शकतो भाव? काय सांगतायत एक्सपर्ट्स? जाणून घ्या

साप्ताहिक दृष्ट्या विचार करता, MCX वर सोन्याचा भाव 1.07 टक्क्यांनी वाढून 61,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 04:24 PM2023-11-25T16:24:33+5:302023-11-25T16:26:28+5:30

साप्ताहिक दृष्ट्या विचार करता, MCX वर सोन्याचा भाव 1.07 टक्क्यांनी वाढून 61,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 

gold closes to all-time high price know about What experts says | 'ऑल-टाइम हाय'च्या जवळ पोहोचलं सोनं, कुठवर पोहोचू शकतो भाव? काय सांगतायत एक्सपर्ट्स? जाणून घ्या

'ऑल-टाइम हाय'च्या जवळ पोहोचलं सोनं, कुठवर पोहोचू शकतो भाव? काय सांगतायत एक्सपर्ट्स? जाणून घ्या

सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा तेजी दिसून येत आहे. या आठवड्यात या दोन्ही धातूंच्या किंमतीत एक टक्क्याहून अधिकची तेजी दिसून आली आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेमध्ये व्याजदरातील स्थिरतेची अपेक्षा आणि डॉलर निर्देशांकातील घसरण, यामुळे सोन्याला बळकटी मिळाली आहे. साप्ताहिक दृष्ट्या विचार करता, MCX वर सोन्याचा भाव 1.07 टक्क्यांनी वाढून 61,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 

तर चांदी 1.02 टक्क्यांच्या वाढीसह 73,915 रुपये किलोवर पोहोचली आहे. अर्थात एमसीएक्सवर सोन्याची किंमत आपल्या ऑल-टाइम हायच्या नजीक पोहोचली आहे. MCX वर सोन्याचा सार्वकालिक उच्चांक 61,914 रुपये आहे. 16 नोव्हेंबर 2023 रोजी सोन्याने ही पातळी गाठली होती.

जिंस मार्केट एक्सपर्ट्सच्या मते, यूएस डॉलरच्या घसरणीमुळे गोल्ड आणि सिल्व्हरची चमक वाढली आहे. डॉलर इंडेक्स 103.50 च्याही खालच्या पातळीवर बंद झाला. तो 100 च्याही खाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, अमेरिकेची सेंट्रल बँक फेड रिझर्व्ह व्याज दर वाढ रोखू शकते. एवढेच नाही, तर पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत व्याज दरात घट केली जाऊ शकते, असाही अंदाज आहे. यामुळे डॉलर ऐवजी गोल्ड आणि सिल्व्हरला  फायदा होत आहे. इन्व्हेस्टर्स डॉलर ऐवजी सोने आणइ चांदीकडे वळत आहेत.

कुठपर्यंत पोहोचू शकते किंमत -
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा दर अल्प ते मध्यम कालावधीत 2,050 आणि 2,070 डॉलर प्रति ओंसपर्यंत पोहोचू शकतो. याच पद्धतीने एमसीएक्सवर सोन्याची किंमत 61,700 वरून 62,400 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. जर याची किंमत 61,250 रुपयांपर्यंत घसरली तर, ते 60,800 रुपयांच्या स्टॉप लॉसवर खरेदी केले जाऊ शकते. 

याच पद्दतीने, चांदीची किंमतही एमसीएक्सवर अल्प ते मध्यम कालावधीपर्यंत 75,000 हजार रुपयांवर पोहोचू शकते. कारण, आमेरिकेमध्ये पुढील आठवड्यात पीसीई प्राइस इंडेक्स आणि तिसऱ्या तिमाहीतील जीडीपी रिव्हिजनचे आकडे येणार आहेत. याशिवाय फेडच्या चेअरमनचेही भाषण होणार आहे. यामुळे सोन्याच्या किंमतीवर थेट परिणाम होऊ शकतो.

Web Title: gold closes to all-time high price know about What experts says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.