Lokmat Money > बिझनेस न्यूज > दागिने खरेदीवर तनिष्क देणार सोन्याचे नाणे भेट

दागिने खरेदीवर तनिष्क देणार सोन्याचे नाणे भेट

दीपावलीच्या शुभपर्वावर ‘तनिष्क’ने पाहताच नजरेत ठसणारी ‘दिव्यम’ सोन्याचे वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्य असलेले दागदागिने बाजारात आणले आहेत. दिव्यम सुवर्ण

By admin | Published: November 5, 2015 12:25 AM2015-11-05T00:25:12+5:302015-11-05T00:25:12+5:30

दीपावलीच्या शुभपर्वावर ‘तनिष्क’ने पाहताच नजरेत ठसणारी ‘दिव्यम’ सोन्याचे वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्य असलेले दागदागिने बाजारात आणले आहेत. दिव्यम सुवर्ण

Gold coin gift to buy jewelery | दागिने खरेदीवर तनिष्क देणार सोन्याचे नाणे भेट

दागिने खरेदीवर तनिष्क देणार सोन्याचे नाणे भेट

मुंबई : दीपावलीच्या शुभपर्वावर ‘तनिष्क’ने पाहताच नजरेत ठसणारी ‘दिव्यम’ सोन्याचे वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्य असलेले दागदागिने बाजारात आणले आहेत. दिव्यम सुवर्ण दागदागिन्यांच्या (गोल्ड ज्वेलरी कलेक्शन) या संग्रहात अत्यंत कलात्मक, आकर्षक आणि नक्षीदार तसेच सौंदर्य खुलविणाऱ्या दागदागिन्यांचा समावेश आहे. भारतीय मंदिराच्या गौरवशाली कलेने नटलेल्या या वैविध्यपूर्ण मोहक दागदागिन्यांत लांब हार, नेकलेस, अंगठ्या, बांगड्या, झुमके आणि मणिहारसह १५० हून अधिक अद्वितीय अशा दागदागिन्यांचा समावेश
आहे.
दिवाळीत सोन्याचे दागदागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच भारतीयांची ही जुनी परंपरा असून दिवाळी हा सण समृद्धीचे प्रतीक मानला जातो. हीच परंपरा ध्यानात घेऊन तनिष्कने दिव्यम सुवर्ण दागदागिन्यांची वैविध्यपूर्ण मालिका बाजारात आणली आहे. हा प्रकाशोत्सव अधिक प्रकाशमान करण्यासाठी तनिष्क १० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर किंवा ८ हजार आणि त्यापेक्षा अधिक किमतीच्या हिऱ्यांच्या दागिन्यांवर सोन्याचे नाणेही भेट देणार आहे. तथापि, या योजनेचा अवधी शहरागणिक वेगळा असून त्यासाठी काही अटीही आहेत.
दिव्यम सुवर्ण दागदागिने सादर करून दीपावलीच्या शुभपर्वाचा भागीदार होता आले, याचा आपणास अभिमान वाटतो, असे तनिष्कची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर अभिनेत्री दीपिका पदुकोन यांनी म्हटले आहे. उत्कृष्ट आणि कलात्मक नक्षीदार सोने आणि हिऱ्यांचे दागदागिने उपलब्ध असलेले भारतातील एकमेव ब्रँड म्हणजे तनिष्क ज्वेलरी होय.

Web Title: Gold coin gift to buy jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.