Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव

सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव

दिवाळीच्या काळातही ही वाढ सुरूच आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने भावात ४५० रुपयांची वाढ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 06:13 AM2024-10-31T06:13:08+5:302024-10-31T06:14:04+5:30

दिवाळीच्या काळातही ही वाढ सुरूच आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने भावात ४५० रुपयांची वाढ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली.

Gold crossed 80 thousand for the first time before Lakshmi Puja; Silver also ate the price | सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव

सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव

जळगाव : सण-उत्सवाच्या काळात सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून लक्ष्मीपूजनाच्या दोन दिवस अगोदरच बुधवारी (३० ऑक्टोबर) ४०० रुपयांची वाढ होऊन सोने भावाने ८० हजार रुपयांचा पल्ला गाठला. चांदीच्या भावातही एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ती ९९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.

दिवाळीच्या काळातही ही वाढ सुरूच आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने भावात ४५० रुपयांची वाढ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली. या वाढीने सोने भावाने प्रथमच ८० हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह ८२ हजार ४०० रुपये मोजावे लागणार आहे. 

धनत्रयोदशीला चांदीत एक हजार ५०० रुपयांची वाढ झाली व ती ९८ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली. दोन दिवसात चांदी भावात दोन हजार ८०० रुपयांची वाढ होऊन ती ९९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

Web Title: Gold crossed 80 thousand for the first time before Lakshmi Puja; Silver also ate the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.