Gold rate: मंगळवारी सोन्याच्या दरानं उच्चांकी स्तर गाठला आणि सोनं तब्बल एक लाख रुपयांच्या वर गेलं. यानंतर सोशल मीडियावरही काही मीम्स व्हायरल झाले. सोशल मीडियाच्या या युगात कोणतीही गोष्ट केव्हाही व्हायरल होऊ शकते. सध्या एका ३५ वर्षांपूर्वीच्या चित्रपटाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल झालेला व्हिडीओ बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा आहे. या व्हिडीओमध्ये शक्ती कपूरनं सोन्याच्या किंमतीबाबत एक रंजक भविष्यवाणी केली आहे. "आपल्या सोन्याची किंमत वाढेल आणि एक वेळ अशी येईल जेव्हा सोन्याची किंमत १ लाख रुपये तोळा होईल, असं शक्ती कपूर या व्हिडीओत म्हणताना दिसतोय. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) मंगळवारी सोन्याच्या किंमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आणि पहिल्यांदाच एक लाख रुपये प्रति दहा ग्रॅमचा टप्पा ओलांडला.
कोणत्या चित्रपटातील आहे व्हिडीओ?
ही व्हिडीओ क्लिप १९८९ मध्ये आलेल्या गुरु चित्रपटातील आहे. या चित्रपटात शक्ती कपूर खलनायकाच्या भूमिकेत आहे. आपच्या सोन्याचे दर ५०००, १०,०००, ५०,००० रुपये आणि नंतर १ लाख रुपये प्रति तोळा पर्यंत पोहोचतील, असं शक्ती कपूर यात म्हणताना दिसतोय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही युजर्सनं हा व्हिडीओ शेअर केलाय. काही जणांनी शक्ती कपूरनं तेव्हाच भविष्यवाणी केल्याचं म्हटलंय, तर काही जणांनी किंमतीतील तेजीबद्दल चिंता व्यक्त केलीये.
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
एक तोळा सोन्याची किंमत किती?
गुड रिटर्न्सच्या मते, आज मुंबई, पुण्यामध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १,०१,३५० रुपये आहे. तर २२ कॅरेटची किंमत थोडी कमी म्हणजेच ९२,९०० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत मुंबईत ७६,०१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या १० ग्रॅमसाठी १,०१,५०० रुपये मोजावे लागणारेत. तर दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या २२ कॅरेट सोन्याची प्रति १० ग्रॅमची किंमत ९३,०५० रुपये आहे.