मुंबई : चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी २८ टक्क्यांनी घटून १९४.८ टनांवर आली आहे. सोन्याच्या वाढलेल्या किमती आणि ग्रामीण भागात अजूनही न सुधालेली आर्थिक स्थिती ही या मागील प्रमुख कारणे आहेत.
जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूजीसी) जारी केलेल्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २0१५ च्या तिसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी २७१.१ टन इतकी राहिली होती. गेल्या वर्षी सोन्याची किंमत घसरून २५,५८६ रुपये प्रति तोळा झाली होती. त्यामुळे मागणी अभूतपूर्वरीत्या वाढली होती.
डब्ल्यूजीसीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पीआर यांनी सांगितले की, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत मूल्याच्या पातळीवर सोन्याची मागणी १२ टक्क्यांनी घटली. या काळात सोन्याला ५५,९७0 कोटी रुपयांची मागणी राहिली. गेल्या वर्षी हा आकडा ६३,६६0 कोटी रुपये होता.
यंदा पावसाळा चांगला राहिला असला, तरी शेतकऱ्यांच्या हातात अजून पैसा आलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून मागणी वाढलेली नाही. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील मागणी अजूनही मोठ्या प्रमाणात कमजोर आहे. मागणी न वाढण्यामागे सोन्याच्या भरमसाठ वाढलेल्या किमती हेही मुख्य कारण आहे. याशिवाय सोन्याच्या खरेदीवर सरकारने अनेक जाचक अटी लादल्या आहेत. २ लाखांवरील सोने खरेदीवर उत्पादन शुल्क लावण्यात आले आहे. पॅन क्रमांक सक्तीचा करण्यात
आला आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने
राबविलेल्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेच्या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून आले. काळा पैसा पांढरा करण्यासाठी ४५ टक्के कर लावण्यात आला
होता.
यंदाच्या संपूर्ण वर्षात ६५0 ते ७५0 टन सोने विकले जाईल, असा अंदाज सोमसुंदरम यांनी व्यक्त
केला. (प्रतिनिधी)
सोन्याची मागणी २८ टक्के घटली
चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी २८ टक्क्यांनी घटून १९४.८ टनांवर आली आहे. सोन्याच्या वाढलेल्या किमती आणि ग्रामीण भागात अजूनही
By admin | Published: November 9, 2016 06:55 AM2016-11-09T06:55:32+5:302016-11-09T06:55:32+5:30