Join us

सोने २१० रुपयांनी खाली,चांदी १५० रुपयांनी उजळ

By admin | Published: October 06, 2015 4:21 AM

विदेशी बाजारातील मंदावलेली मागणी आणि दागिने निर्मात्यांकडून नसलेला उठाव यामुळे सोन्याचा भाव सोमवारी १० गॅ्रममागे २१० रुपयांनी खाली येऊन २६,६०० रुपयांवर आला.

नवी दिल्ली : विदेशी बाजारातील मंदावलेली मागणी आणि दागिने निर्मात्यांकडून नसलेला उठाव यामुळे सोन्याचा भाव सोमवारी १० गॅ्रममागे २१० रुपयांनी खाली येऊन २६,६०० रुपयांवर आला. मात्र चांदीच्या भावात किलोमागे १५० रुपयांची वाढ होऊन ती ३५,९५० रुपये झाली. गेल्या शुक्रवारी सोन्याचे भाव वाढल्यानंतर जागतिक बाजारात त्याला उठाव मिळाला नाही व दागिने निर्मात्यांकडूनही मागणी नसल्यामुळे सोने स्वस्त झाले. जागतिक बाजारातही (सिंगापूर) सोन्याचा भाव ०.१७ टक्क्यांनी खाली येऊन औंसाला १,१३७.५० अमेरिकन डॉलर झाला; परंतु चांदी ०.४३ टक्क्यांनी वाढून औंसाला १५.३३ अमेरिकन डॉलर झाली. गेल्या शनिवारी सोन्याने यावर्षीची सर्वात जास्त म्हणजे एका दिवसात ६६० रुपयांची उसळी मारली होती. राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफ बाजारात ९९.९ आणि ९९.५ शुद्धतेच्या सोन्याचा भाव २१० रुपयांनी खाली येऊन अनुक्रमे २६,६०० व २६,४५० रुपये झाला होता. आठ ग्रॅमच्या सोन्याच्या नाण्याचा भाव १०० रुपयांनी वाढून २२,४०० रुपये झाला. याविरुद्ध चित्र चांदीचे होते. तयार चांदी किलोमागे १५० रुपयांनी वाढून ३५,९५० रुपये तर वीकली बेसड् डिलिव्हरीची चांदी १,१८५ रुपयांनी महाग होऊन ३५,७६० रुपयांवर गेली.