नवी दिल्ली : ज्वेलरांनी खरेदीत हात आखडता घेतल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोने १२५ रुपयांनी घसरून ३१,0५0 रुपये तोळा झाले. चांदीही १00 रुपयांनी घसरून ४५,२00 रुपये किलो झाली.
सिंगापूर येथील बाजारात सोने 0.१४ टक्के घसरून १,३२९.३0 डॉलर प्रति औंस झाली. दिल्लीत ९९.९ टक्के व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १२५ रुपयांनी घसरून अनुक्रमे ३१,0५0 रुपये आणि ३0,९00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. काल सोने २५ रुपयांनी वाढले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,४00 रुपयांवर स्थिर राहिला. तयार चांदी १00 रुपयांनी उतरून ४५,२00 रुपये किलो झाली. साप्ताहिक डिलिव्हरीची चांदी मात्र १0५ रुपयांनी महागून ४५,४४५ रुपये किलो झाली. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ७५ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७६ हजार रुपये प्रति शेकडा असा स्थिर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने घसरले
ज्वेलरांनी खरेदीत हात आखडता घेतल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोने १२५ रुपयांनी घसरून ३१,0५0 रुपये तोळा झाले. चांदीही १00 रुपयांनी घसरून ४५,२00 रुपये किलो झाली.
By admin | Published: September 14, 2016 05:44 AM2016-09-14T05:44:14+5:302016-09-14T05:44:37+5:30