नवी दिल्ली : जागतिक बाजारातील नरमाई आणि ज्वेलरांनी खरेदीत घेतलेला आखडता हात यामुळे सोने आणखी ३0 रुपयांनी घसरून ३0,४९0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. काल सोने ७३0 रुपयांनी घसरले होते. चांदी किलोमागे ४00 रुपयांनी घसरून ४३ हजारांच्या खाली आली आहे. जागतिक बाजारात सोने ३ महिन्यांच्या नीचांकावर गेले आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरांत वाढ करण्याची शक्यता व्यक्त झाल्याने बाजारात ही पडझड झाली आहे. सिंगापुरात सोने 0.१४ टक्क्यांनी घसरून १,२६४.७0 डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रत्येकी ३0 रुपयांनी घसरून अनुक्रमे ३0,४९0 रुपये आणि ३0,३४0 रुपये प्रति तोळा झाला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव ५0 रुपयांनी घसरून २४,४00 रुपये झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने आणखी ३0 रुपयांनी घसरले
By admin | Published: October 07, 2016 2:23 AM