Join us

सोने २६0 रुपयांनी उतरले

By admin | Published: October 13, 2016 5:11 AM

जागतिक बाजारातील नरमाईचा कल आणि ज्वेलरांनी केलेली कमी खरेदी, यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी घसरण झाली.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील नरमाईचा कल आणि ज्वेलरांनी केलेली कमी खरेदी, यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी घसरण झाली. सोने २६0 रुपयांनी घसरून ३0,१५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदी १६0 रुपयांनी उतरून ४२,५९0 रुपये किलो झाली.न्यूयॉर्कमधील बाजारात काल सोने 0.५६ टक्क्यांनी उतरून १,२५२.४0 डॉलर प्रति औंस झाले होते. चांदीही १.0२ टक्क्यांनी उतरून १७.४३ डॉलर प्रति औंस झाली होती. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २६0 रुपयांनी उतरून अनुक्रमे ३0,१५0 रुपये आणि ३0,000 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. काल दसऱ्यामुळे बाजार बंद होता. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव १00 रुपयांनी उतरून २४,३00 रुपये झाला. सोन्याप्रमाणेच तयार चांदी १६0 रुपयांनी उतरून ४३,५९0 रुपये किलो झाली. साप्ताहिक डिलिव्हरीची चांदी २९५ रुपयांनी उतरून ४२,0९0 रुपये किलो झाली. चांदीचे शिक्के मात्र, १ हजार रुपयांनी वाढून खरेदीसाठी ७३ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७५ हजार रुपये झाले. खरेदी होत असल्यामुळे ही भाववाढ झाली. (वृत्तसंस्था)