नवी दिल्ली : जागतिक बाजारातील नरमाईच्या कलाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने २00 रुपयांनी उतरून २९,७५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीही १00 रुपयांनी घसरून ४३,१00 रुपये किलो झाली.जागतिक नरमाईमुळे स्थानिक बाजारात ज्वेलरांनी खरेदीत आखडता हात घेतला. त्याचा फटका सोन्याला बसला. औद्योगिक क्षेत्राकडून, तसेच शिक्के निर्मात्यांकडून असलेली मागणी घसरल्याचा फटका चांदीला बसला. प्रमुख जागतिक बाजार असलेल्या सिंगापुरात सोने 0.0९ टक्क्यांनी घसरून १,२३४.३0 डॉलर प्रतिऔंस झाले. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेले सोने अनुक्रमे २९,७५0 रुपये आणि २९,६00 रुपये प्रति १0 गॅ्रम झाले.
सोने उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 12:48 AM