Gold Silver Price Today 26 November: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात अजूनही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १६३० रुपयांनी स्वस्त होऊन ७५,४५१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीच्या दरात मात्र आज १३४५ रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदी ८८,१०० रुपयांवर उघडली. हा दर आयबीएचा आहे, ज्यावर जीएसटीचा समावेश नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.
३० ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर ७९,६८१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ९८,३४० रुपये प्रति किलो होता. या तुलनेत आज सोनं ४२३० रुपयांनी तर चांदी १०,२४० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज २३ कॅरेट सोन्याचा भाव १६२३ रुपयांनी कमी होऊन ७५,१४९ रुपये झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा सरासरी दर १४९३ रुपयांनी स्वस्त होऊन ६९,११९ रुपये झाला. तर १८ कॅरेट सोन्याचा भावही १२२३ रुपयांनी कमी होऊन ५६,५८८ रुपये प्रति दहा ग्रॅम झालाय.
दिल्लीत सोन्याचे दर
दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७८,७१३ रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी तो ७९,८१३ रुपयांवर होता. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७६,४९२ रुपये होता. आज चांदीचा भाव ९४,५०० रुपये प्रति किलो झाला. तर सोमवारी तो ९५,१०० रुपये प्रति किलो होता.
चेन्नईत आज सोन्याचा दर
चेन्नईत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७८,५६१ रुपये आणि सोमवारी ७९,६६१ रुपये प्रति १० ग्रॅम होता. गेल्या आठवड्यात तो ७६,३४१ रुपये प्रति १० ग्रॅम होता. चेन्नईत आज चांदीचा भाव १,०३,१०० रुपये प्रति किलो आहे. काल तो १,०३,७०० रुपये होता.
मुंबईत सोन्याचा दर किती?
आज मुंबईत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७८,५६७ रुपये आहे. सोमवारी तो ७९,६६७ रुपये होता आणि गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव ७६,३४७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. मुंबईत आज चांदीचा भाव ९३,८०० रुपये प्रति किलो तर सोमवारी ९४,४०० रुपये होता. गेल्या आठवड्यात तो ९१,८०० रुपये किलो होता.