नवी दिल्ली : सोन्याच्या भावाची चमक बुधवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशीही कमी झाली. जागतिक बाजारातील नरमी आणि दागिने निर्मात्यांकडून घटलेल्या मागणीमुळे १० गॅ्रम सोन्याचा भाव ७५ रुपयांनी खाली येऊन २५,६२५ रुपये झाला. चांदीच्या भावात मात्र काहीही बदल झाला नाही. चांदीचा भाव किलोमागे ३४,१०० असा स्थिर होता. जागतिक बाजारात उत्साह नसल्यामुळे, तसेच अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह पुढील महिन्यात व्याजदरात वाढ करील. या चर्चेमुळे अमेरिकेत ग्राहक निर्देशांक वर गेला व पर्यायाने सोन्याचे भाव घसरला. सिंगापूरच्या बाजारात सोने स्वस्त होऊन १,०६४.५५ अमेरिकन डॉलरवर आले.
सोने दुसऱ्या दिवशीही घसरले
सोन्याच्या भावाची चमक बुधवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशीही कमी झाली. जागतिक बाजारातील नरमी आणि दागिने निर्मात्यांकडून घटलेल्या मागणीमुळे १० गॅ्रम सोन्याचा
By admin | Published: November 19, 2015 01:24 AM2015-11-19T01:24:19+5:302015-11-19T01:24:19+5:30