नवी दिल्ली : सराफा बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याची तेजी कायम राहिली. जागतिक बाजारात असलेला उठाव आणि त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी केलेली खरेदी, यामुळे शुक्रवारी सोने आणखी २0 रुपयांनी वधारून २६,३५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. हा गेल्या २ महिन्यांतील उच्चांक आहे.सोन्याप्रमाणेच चांदीतही तेजी राहिली. औद्योगिक प्रकल्प आणि नाणे उत्पादकांकडून मागणी वाढल्याने चांदीही १00 रुपयांनी वधारून ३४,१00 रुपये प्रतिकिलो झाली. जागतिक बाजारात गुरुवारी सोन्याने दोन महिन्यांचा उच्चांक गाठला होता. स्थानिक सराफांनीही जोरदार खरेदी केल्याने सोन्याची तेजी कायम राहिली.जागतिक स्तरावर न्यूयॉर्क येथे सोन्याचे भाव १.४१ टक्क्यांनी वाढून १,१0९.२0 अमेरिकी डॉलर प्रतिऔंस झाले. चांदीच्या भावातही २.२२ टक्क्यांनी वाढ होत १४.३१ अमेरिकी डॉलर प्रतिऔंस असे भाव झाले. दुसरीकडे सिंगापुरात मात्र सोन्याचे भाव १,0९९.५९ अमेरिकी डॉलर प्रतिऔंस होते.राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचे भाव २0 रुपयांनी वाढून अनुक्रमे २६,३५0 आणि २६,२00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. ६ नोव्हेंबरनंतरचा हा सर्वोच्च स्तर आहे. गेल्या ४ दिवसांत सोने ९१0 रुपयांनी महागले होते.
सलग पाचव्या दिवशी सोने तेजीत
By admin | Published: January 09, 2016 12:55 AM