Join us

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 2:34 PM

Gold Price Today : सोन्यासह चांदीच्या स्थानिक वायदा भावात सुद्धा बुधवारी सकाळी मोठी घसरण दिसून आली.

ठळक मुद्देजागतिक पातळीवर चांदीच्या वायदा किंमतींमध्ये सुद्धा घसरण दिसून आली.

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या स्थानिक वायदा बाजारातील किंमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर बुधवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी डिसेंबर वायदा बाजारात सोन्याचा भाव ५०६ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम ५०,०२० रुपयांवर आला. याशिवाय, फेब्रुवारी वायदा बाजारात सोन्याचा भावात सध्या १.२७ टक्के म्हणजेच ६४६ रुपयांची घट होऊन प्रति १० ग्रॅम २०,२०३ रुपये ट्रेंड करत असल्याचे दिसून आले. तसेच, बुधवारी सकाळी जागतिक वायदा किंमतींमध्ये घसरण दिसून आली.

सोन्यासह चांदीच्या स्थानिक वायदा भावात सुद्धा बुधवारी सकाळी मोठी घसरण दिसून आली. एमसीएक्स एक्सचेंजच्या डिसेंबर वायदा बाजारात चांदीचा भाव बुधवारी सकाळी १० वाजून २७ मिनिटांवर १.६६ टक्के म्हणजेच १००७ रुपयांची घट होऊन प्रति किलो ५९,५६४ रुपये ट्रेंड करत होता. तसेच, जागतिक पातळीवर चांदीच्या वायदा किंमतींमध्ये सुद्धा घसरण दिसून आली.

जागतिक स्तरावर सोन्याचे भावब्लूमबर्गच्या मते, बुधवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदा बाजारातील भाव १.१४  टक्क्यांनी म्हणजे २१.८० डॉलरने घसरून १८८७ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसून आले. याशिवाय, सोन्याचा जागतिक स्पॉट किंमतीत सध्या ०.२८ टक्के म्हणजेच ५.१७ डॉलरची घट होऊन १८८३.३५ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसून आला. 

जागतिक स्तरावरील चांदीचे दरब्लूमबर्गच्या मते, बुधवारी सकाळी कॉमेक्सवरील चांदीचा जागतिक वायदा भाव १.६३ टक्क्यांनी म्हणजेच ०.३९ डॉलरची घट होऊन २३.५२ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसला. त्याचबरोबर, चांदीच्या जागतिक स्पॉट बाजारातील भाव १.६७ टक्के म्हणजेच ०.३९ डॉलरची वाढ होऊन २३.४५ डॉलर प्रति औंस ट्रेंड होताना दिसला.

टॅग्स :सोनंचांदीव्यवसाय