Lokmat Money > बिझनेस न्यूज > Tax on Gold Gift Rules : गिफ्ट म्हणून मिळालेल्या सोन्यावर कर आकारला जातो का? जाणून घ्या, सविस्तर....

Tax on Gold Gift Rules : गिफ्ट म्हणून मिळालेल्या सोन्यावर कर आकारला जातो का? जाणून घ्या, सविस्तर....

Tax on Gold Gift Rules :भारतात लोकांना विशेषतः महिलांना सोन्यामध्ये खूप रस आहे. तसेच, लोकांना लग्नात गिफ्ट म्हणून सोने देणे- घेणे आवडते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 03:14 PM2022-05-28T15:14:47+5:302022-05-28T15:15:06+5:30

Tax on Gold Gift Rules :भारतात लोकांना विशेषतः महिलांना सोन्यामध्ये खूप रस आहे. तसेच, लोकांना लग्नात गिफ्ट म्हणून सोने देणे- घेणे आवडते.

gold gift can come under taxable income know and take information about it | Tax on Gold Gift Rules : गिफ्ट म्हणून मिळालेल्या सोन्यावर कर आकारला जातो का? जाणून घ्या, सविस्तर....

Tax on Gold Gift Rules : गिफ्ट म्हणून मिळालेल्या सोन्यावर कर आकारला जातो का? जाणून घ्या, सविस्तर....

नवी दिल्ली : एकाद्या व्यक्तीने गिफ्ट केलेल्या सोन्याच्या वस्तूंवर कर आकारला जातो, याबाबत तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही येथे संपूर्ण डिटेल्स जाणून घेऊ शकता. एक निश्चित लिमिट आहे, ज्याच्या वर सोने गिफ्ट म्हणून घेणे तुमच्यासाठी कर दायित्व बनू शकते.

भारतात लोकांना विशेषतः महिलांना सोन्यामध्ये खूप रस आहे. तसेच, लोकांना लग्नात गिफ्ट म्हणून सोने देणे- घेणे आवडते. दरम्यान, याठिकाणी जरी आपण  गिफ्टवस्तूमध्ये मिळालेल्या सोन्याबद्दल बोलत आहोत, तर तुम्हाला हे देखील माहित असले पाहिजे की सोन्याच्या स्वरूपात असलेल्या सर्व प्रकारची गिफ्ट कराच्या कक्षेत नाहीत. 

गिफ्ट म्हणून मिळालेल्या सोन्यावर कसा आकारला जातो कर?
समजा तुम्हाला एखाद्या मित्राकडून किंवा दूरच्या नातेवाईकाकडून गिफ्ट म्हणून सोने किंवा दागिने मिळाले असतील आणि त्या सोन्याची किंवा दागिन्यांची किंमत 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर कर भरावा लागेल. हे Income from other source कॉलममध्ये प्रविष्ट केले आहे.

कोणत्या प्रकारचे सोने, जे गिफ्ट म्हणून मिळालेले करमुक्त असेल?
तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून गिफ्ट म्हणून मिळालेले सोने कराच्या अधीन नाही. जर वडिलांनी मुलीला तिच्या लग्नात सोने गिफ्ट दिले तर त्यावर कोणताही कर लागणार नाही. जर तुम्ही मुलांना त्यांच्या वाढदिवशी सोन्याचे दागिने गिफ्ट केले तर त्यावर कोणताही कर नाही. या प्रकारच्या भेटवस्तूमध्ये सोन्याच्या रकमेवर मर्यादा नाही.

वारशाने मिळालेले सोने देखील करमुक्त
वारशाने मिळालेल्या सोन्यावर कोणतेही कर दायित्व नाही. जसे की, आईकडून मुलीला-सुनेला आणि मुली-सुनेकडून त्यांच्या मुलांना दिलेले सोने करमुक्त असते आणि ज्याला ते मिळते त्याला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही.

Web Title: gold gift can come under taxable income know and take information about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GoldTaxसोनंकर