Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, ९ हजार रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव

Gold: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, ९ हजार रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव

Gold Price in India: सद्यस्थितीत सोने सर्वकालीन सर्वोच्च दरांपासून सुमारे ९ हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. सोन्याचा सर्वोच्च दर ऑगस्ट २०२० मध्ये नोंदवला गेला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 02:59 PM2021-07-04T14:59:44+5:302021-07-04T15:10:44+5:30

Gold Price in India: सद्यस्थितीत सोने सर्वकालीन सर्वोच्च दरांपासून सुमारे ९ हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. सोन्याचा सर्वोच्च दर ऑगस्ट २०२० मध्ये नोंदवला गेला होता.

Gold: Good news for gold buyers, it became cheaper by Rs 9,000, find out the price of 10 grams | Gold: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, ९ हजार रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव

Gold: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, ९ हजार रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव

नवी दिल्ली - या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत होता. मात्र शुक्रवारी एमलीएक्सवर सोन्याचा भाव किंचित वाढून बाजार बंद झाला होता. शुक्रवारी सोन्याच्या दरात ३२४ रुपयांची वाढ होऊन प्रति १० ग्रॅम सोन्यासाठीचा दर ४७ हजार ५८७ वर पोहोचला होता. (Gold Price in India) मात्र सद्यस्थितीत सोने सर्वकालीन सर्वोच्च दरांपासून सुमारे ९ हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. सोन्याचा सर्वोच्च दर ऑगस्ट २०२० मध्ये नोंदवला गेला होता. तेव्हा प्रति दहा ग्रॅमसाठी सोन्याचा दर ५६ हजार २०० रुपयांवर पोहोचला होता. (Good news for gold buyers, it became cheaper by Rs 9,000, find out the price of 10 grams)

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर शुक्रवारी सोन्यामध्ये तेजी दिसून आली. त्याशिवाय सोन्यामध्ये ऑगस्टच्या फ्युचर ट्रेडमध्ये ३०० रुपयांच्या तेजीसह ४७ हजार ३३९ रुपये दराने सोन्याची विक्री झाली. तर चांदीचा जुलै महिन्यासाठीचा फ्युचर ट्रेड १००४ रुपयांच्या तेजीसह ६९ हजार १५९ रुपयांच्या स्तरावर ट्रेड झाला.

सोन्याच्या २४ कॅरेटच्या भावाचा विचार केल्यास दिल्लीमध्ये प्रति १० ग्रॅमसाठीचा दर ५० हजार ४६० रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईमध्ये ४८ हजार ९४० रुपये, मुंबईमध्ये  ४७ हजार ३१० रुपये, कोलकात्यामध्ये ४९ हजार ६१० रुपये, हैदराबादमध्ये ४८ हजार ३४० रुपये पाटणामध्ये ४७ हजार ३१० रुपये, लखनौ आणि जयपूरमध्ये ५० हजार ४६० रुपये एवढा दर आहे.

दरम्यान, तज्ज्ञांच्या मते या वर्षाच्या अखेरीपर्यंत सोन्याचे दर त्याच्या या आधीच्या सर्वोच्च पातळीला तोडून ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचतील. अशा परिस्थितीत गुंतवणुकदारांनी सहा महिन्यांचा कालावधी आणि स्टॉपलॉस लावून खरेदी केल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. सोन्यामधील गुंतवणुकीचा विचार केल्यास गतवर्षी सोन्यामध्ये २८ टक्के रिटर्न मिळाला होता. जर तुम्ही लाँग टर्मसाठी गुंतवणूक करत असाल तर सोने हे अद्यापही गुंतवणुकीसाठी खूप सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे. त्यामध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो.  

Web Title: Gold: Good news for gold buyers, it became cheaper by Rs 9,000, find out the price of 10 grams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.