नवी दिल्ली - आजपासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य झाले आहे. अर्थात आजपासून आपण कुठल्याही दुकानात सोने खरेदीसाठी गेलात तर आपल्याला केवळ हॉलमार्क असलेलेच सोने मिळेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता या सोन्यावर, ते किती कॅरेटचे सोने आहे, हे लिहिलेले असेल. बीआयएसनुसर, अनिवार्य हॉलमार्किंगमुळे सामान्य लोकांना फायदा होईल. यामुळे ग्राहकांना सोन्याचे दागिने खरेदी करताना कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. तसेच त्यांना दागिन्यांवर लिहिलेल्या शुद्धतेनुसारच दागिने मिळतील. (Gold hallmarking mandatory from today jewellers can sell only hallmarked jewellery)
मिळणार केवळ 14, 18 आणि 22 कॅरेटचे सोने -
गोल्ड हॉलमार्किंग म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचे एक प्रमाणपत्र आहे. आजपासून सर्व ज्वैलर्सना केवळ 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेटचे सोनेच विकण्याची परवाणगी असेल. बीआयएस एप्रिल 2000 पासून गोल्ड हॉलमार्किंगची स्किम चालवत आहे. सध्या केवळ 40 टक्के ज्वैलरीचेच हॉलमार्किंग झालेली आहे. ज्वैलर्सच्या सोयीसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑटोमॅटिक करण्यात आली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (डब्ल्यूजीसी) मते, भारतात जवळपास चार लाख ज्वैलर्स आहेत आणि यांपैकी 35,879 बीआयएस सर्टिफाइड आहेत.
आजपासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य; तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार? जाणून घ्या
अशी पटेल सोन्याची ओळख?
कुठलाही ज्वैलर हॉलमार्किंग शिवाय सोने विकताना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यात एक वर्षाच्या शिक्षेशिवाय, त्याच्याकडून गोल्ड ज्वैलरीच्या रकमेच्या पाच टक्के दंडही वसून केला जाऊ शकतो. प्रत्येक कॅरेटच्या सोन्यासाठी हॉलमार्क नंबर टाकले जातात. ज्वैलर्सकडून 22 कॅरेटसाठी 916 नंबरचा वापर केला जातो. 18 कॅरेटसाठी 750 नंबरचा वापर केला जातो आणि 14 कॅरेटसाठी 585 नंबरचा वापर केला जातो. यावरून आपल्याला सहजपणे समजेल, की घेतलेले सोने किती कॅरेटचे आहे.
घरातील सोन्याचे काय होईल?
गोल्ड हॉलमार्किंगचा नियम लागू झाल्याने, आता घरात असलेल्या सोन्याचे काय होणार, त्याची विक्री कशी होणार, असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहेत. मात्र, गोल्ड हॉलमार्किंगच्या नव्या नियमांचा घरात असलेल्या सोन्यावर कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. तसेच जुन्या दागिन्यांची विक्री करतानाही याचा काही परिणाम होणार नाही. आपण पूर्वीप्रमाणेच आपले सोने ज्वेलर्सकडे विकू शकता. हा नियम केवळ ज्वेलर्ससाठीच आहे. त्यांना हॉलमार्क शिवाय सोने विकता येणार नाही.