Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण...! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण...! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

आज देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 54,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. याशिवाय मुंबईत 54,500 रुपये, कोलकात्यात 54,500 रुपये तर चेन्नईमध्ये 54,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 07:05 PM2023-09-13T19:05:01+5:302023-09-13T19:05:28+5:30

आज देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 54,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. याशिवाय मुंबईत 54,500 रुपये, कोलकात्यात 54,500 रुपये तर चेन्नईमध्ये 54,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.

Gold has become cheap the price of silver has also fallen Check the latest rate | सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण...! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण...! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

भारतीय बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किंमती घसरल्या आहेत. आज सोन्याचा भाव 58500 च्या खाली आला असून चांदीचा दरही 71,400 च्या जवळपास आहे. अमेरिकेतील महागाई दर वाढण्याच्या शक्यतेमुळे सोन्याच्या दर कमी होत आहेत. 

MCX वर सोन्या-चांदीचा भाव घसरला -
MCX वर सोन्याचा दर 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 58556 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तसेच, चांदीचा भावही 0.62 टक्क्यांच्या घसरणीसह 71486 रुपये प्रती किलोग्रॅमवर आला आहे. इंटरनॅशनल मार्केट मार्केटसंदर्भात बोलायचे झाल्यास, सोन्या-चांदीच्या दरात नरमी दिसत आहे. कॉमॅक्सवर सोन्याचा दर 1933 डॉलर प्रति औंस वर आहे. तर चांदीही घसरणीसह 23.21 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर -
आज देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 54,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. याशिवाय मुंबईत 54,500 रुपये, कोलकात्यात 54,500 रुपये तर चेन्नईमध्ये 54,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.

'24 कॅरेट गोल्ड असते सर्वात शुद्ध -
खरे तर 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते. शुद्ध सोने अथवा 24 कॅरेट सोने हे 99.9 टक्के शुद्धत असते. त्यात इतर कुठलाही धातू मिसळलेला नसतो. सोन्याची नाणी आणि बार तयार करण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा वापर होतो. सोन्याची शुद्धता ही 24 कॅरेटच्या तुलनेत मोजली जाते.

लक्षात असू द्या ही महत्वाची गोष्ट - 
जर आपण सोनं खरेदीसाठी बाजारात जात असाल तर हॉलमार्क बघूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी आपण सरकारी अॅपचाही वापर करू शकता. ‘BIS Care app’ च्या माध्यमाने आपण सोन्याची शुद्धता चेक करू शकता. याशिवाय याच अॅपच्या माध्यमाने आपण तक्रारही करू शकता.

Web Title: Gold has become cheap the price of silver has also fallen Check the latest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.