नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून सतत भाव वाढ होत असलेल्या सोन्याच्या भावात शनिवार, १ ऑगस्ट रोजी ९०० रुपयांनी घसरण होऊन सोने ५४,००० रुपये प्रति तोळ्यावर आले. चांदीत मात्र शुक्रवार, ३१ जुलैच्या तुलनेत एकाच दिवसात एक हजार रुपयांनी वाढ होऊन चांदी ६६,००० रुपये प्रति किलो वर पोहोचली. मागणी वाढण्यासह जागतिक पातळीवर सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने बुधवार, २९ एकाच दिवसात सोन्याच्या भावात १४०० रुपयांनी वाढ होऊन सोने ५४ हजार ९०० रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. त्यावेळी मात्र ६७, ५०० रुपयांवर असलेल्या चांदीत १३०० रुपयांनी घसरण होऊन ती ६६ हजार २०० रुपये प्रति किलोवर आली होती.
सोन्याचे नवनवे विक्रम
जुलैच्या पहिल्या आठवड्यात ७ जुलै रोजी सोने ४९,२०० वर होते. त्यानंतर १४ रोजी सोन्याचे भाव ८०० रुपयांनी वाढून ते ५० हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. त्यानंतर २१ रोजी पुन्हा एक हजाराने वाढ झाली व ते ५१ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. त्यानंतर २८ रोजी अडीच हजार रुपयांनी वाढ होऊन ते ५३ हजार ५०० रुपयांवर पोहचले होते. बुधवार, २९ जुलै रोजी तर एकाच दिवसात त्यात आणखी १४०० रुपयांची वाढ झाली व सोने ५४ हजार ९०० रुपये प्रति तोळा झाले होते. तेंव्हापासून सोने त्याच भावावर होते. शनिवार, १ ऑगस्ट रोजी त्यात ९०० रुपयांनी घसरण होऊन ते ५४,००० रुपयांवर आले.
चांदीमध्ये पुन्हा वाढ
चांदीमध्येदेखील गेल्या अनेक दिवसंपासून वाढ सुरू आहे. ७ जुलै चांदी ५०,५०० वर होती. त्यानंतर १४ रोजी चांदीच्या भावात ३ हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ५४ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती. त्यात २१ जुलै रोजी आणखी सहा हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ६० हजाराच्याही पुढे गेली व ६० हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली होती. २८ रोजी थेट सात हजार रुपये प्रति किलोने वाढ होऊन ती ६७ हजार ५०० रुपयांवर पोहचली होती. मात्र दलालांनी चांदीपेक्षा सोन्यात अधिक गुंतवणूक वाढविल्याने बुधवार, २९ जुलै रोजी चांदीत १३०० रुपयांची घसरण होऊन ती ६६ हजार २०० रुपयांवर आली होती. त्यांनंतर शुक्रवारी, ३१ ऑगस्ट रोजी पुन्हा १२०० रुपयांनी घसरण झाली होती. मात्र शनिवार, १ ऑगस्ट रोजी १००० रुपयांनी वाढ होऊन चांदी ६६,००० रुपयांवर पोहोचली.
सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त, चांदीचे दर १००० रुपयांनी महागले, असे आहेत आजचे दर
मात्र ६७, ५०० रुपयांवर असलेल्या चांदीत १३०० रुपयांनी घसरण होऊन ती ६६ हजार २०० रुपये प्रति किलोवर आली होती.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 03:03 PM2020-08-01T15:03:38+5:302020-08-01T15:24:57+5:30