Join us  

2500 रुपयांपर्यंत स्वस्त झालं सोनं, पुन्हा तेजीची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 1:08 PM

सोन्याचा दर (Gold Price) आता 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्याही खाली आला आहे.

 सोन्याचा दर (Gold Price) आता 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्याही खाली आला आहे. गेल्या महिन्यातील मजबूत मागणीनंतर, सोन्यावर दबाव दिसत आहे. नव्या आर्थक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी झाल्याचे दिसून आले. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 61,800 रुपये या उच्चांकावर पोहोचला होता. मात्र आता, अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे, सोन्याच्या किंमतीत 2,500 रुपये प्रति 10 ग्रॅमची घटन झाली आहे.

यासंदर्भात बोलताना, रिद्धिसिद्धी बुलियन्सचे (RSBL) व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले की, 13 जून रोजी होणार्‍या यूएस फेडच्या बैठकीपूर्वी सोन्याचा भाव 60,000 रुपयांच्या जवळपास आहे. सलग 10 वेळच्या वाढीनंतर, फेड जूनच्या बैठकीत व्याज दर स्थीर ठेवणार, की आपले आक्रमक धोरण कायम ठेवणार? यासंदर्भात अंदाज बांधले जात आहेत.

पुन्हा एकदा भावात तेजीची शक्यता - राहुल कलंतरी म्हणाले, यूएस फेडच्या आगामी बैठकीच्या परिणामाचा सोन्याच्या किंमतीवर प्रभाव पडेल. या बैठकीनंतरच सन्याच्या किमचीचे चित्र स्पष्ट होईल. कलंतरी म्हणाले, डॉलर इंडेक्स 104.50 चा स्तर काय ठेवण्यास सक्षम नाही. अमेरिकेतील महागाई आणि बेरोजगारी संख्या फेडकडून व्याज दर रोखण्याच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. यामुळे सोन्याच्या दरात तेजी दिसून येऊ शकते. 

 

टॅग्स :सोनंबाजारगुंतवणूक