Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याचा दोन आठवड्यांतील उच्चांक

सोन्याचा दोन आठवड्यांतील उच्चांक

आगामी सणासुदीच्या दिवसांत, तसेच लग्नाच्या मोसमात ग्राहकांकडून खरेदी होण्याची शक्यता ध्यानात घेऊन व्यापारी आणि सराफांनी

By admin | Published: September 25, 2015 12:00 AM2015-09-25T00:00:28+5:302015-09-25T00:00:28+5:30

आगामी सणासुदीच्या दिवसांत, तसेच लग्नाच्या मोसमात ग्राहकांकडून खरेदी होण्याची शक्यता ध्यानात घेऊन व्यापारी आणि सराफांनी

Gold high for two weeks | सोन्याचा दोन आठवड्यांतील उच्चांक

सोन्याचा दोन आठवड्यांतील उच्चांक

नवी दिल्ली : आगामी सणासुदीच्या दिवसांत, तसेच लग्नाच्या मोसमात ग्राहकांकडून खरेदी होण्याची शक्यता ध्यानात घेऊन व्यापारी आणि सराफांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने सोन्याने गुरुवारी गेल्या दोन आठवड्यांतील उच्चांकी दर गाठला. त्याचबरोबर चांदीही वधारली.
येथील बाजारात सोने प्रती १० ग्रॅममागे ३१० रुपयांनी वाढून २६,८५० रुपये असे झाले, तर औद्योगिक कारखाने आणि नाणे उत्पादक यांच्याकडून मागणी वाढल्याने चांदी किलोमागे २२५ रुपयांनी वधारून ३५,४०० रुपयांवर गेली.
परदेशातील बाजारातही सोन्याला चांगली मागणी होती, त्यामुळे सोन्याचे भाव वाढले. जागतिक स्तरावर सिंगापुरात सोन्याचा भाव ०.५ टक्क्यांनी वाढून तो ११३५.९६ डॉलर प्रति औंस झाला.

Web Title: Gold high for two weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.