Join us

सोन्याचा दोन आठवड्यांतील उच्चांक

By admin | Published: September 25, 2015 12:00 AM

आगामी सणासुदीच्या दिवसांत, तसेच लग्नाच्या मोसमात ग्राहकांकडून खरेदी होण्याची शक्यता ध्यानात घेऊन व्यापारी आणि सराफांनी

नवी दिल्ली : आगामी सणासुदीच्या दिवसांत, तसेच लग्नाच्या मोसमात ग्राहकांकडून खरेदी होण्याची शक्यता ध्यानात घेऊन व्यापारी आणि सराफांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने सोन्याने गुरुवारी गेल्या दोन आठवड्यांतील उच्चांकी दर गाठला. त्याचबरोबर चांदीही वधारली.येथील बाजारात सोने प्रती १० ग्रॅममागे ३१० रुपयांनी वाढून २६,८५० रुपये असे झाले, तर औद्योगिक कारखाने आणि नाणे उत्पादक यांच्याकडून मागणी वाढल्याने चांदी किलोमागे २२५ रुपयांनी वधारून ३५,४०० रुपयांवर गेली. परदेशातील बाजारातही सोन्याला चांगली मागणी होती, त्यामुळे सोन्याचे भाव वाढले. जागतिक स्तरावर सिंगापुरात सोन्याचा भाव ०.५ टक्क्यांनी वाढून तो ११३५.९६ डॉलर प्रति औंस झाला.